मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यात पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरु करण्याची घोषणा केली आहे. यावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “अनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. (MNS Sandeep Deshpande Criticizes Anil Parab on ST Buses with Full capacity)
“अनिल परब हे 100 टक्के एसटी सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहेत. मात्र ते एसटीच्या सगळ्या प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का? लोकांनी सहा महिने कोमट पाणी प्यायले तरीही कोरोना झाला, ती जबाबदारी कुणाची होती? लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे. त्यामुळे जनतेनी जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं आहे, हे लक्षात असू द्या,” अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच मनसेने मुंबईत लोकल ट्रेन सुरु करण्याची मागणी केली होती. मात्र “लोकल सुरु केल्यानंतर सगळी जबाबदारी मनसे घेणार का?”असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आता मनसेनेही एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का? असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एसटी बसेसला परवानगी देताना सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही पूर्ण क्षमतेने एसटी चालवण्याचा निर्णय घेतला. हे करताना बसमध्ये मास्क लावणं बंधनकारक आहे. प्रत्येक फेरीला बसेसचं निर्जंतुकीकरण केलं जातं आहे. प्रवाशांसाठी देखील बसेसमध्ये सॅनिटायझर ठेवण्यात आलं आहे. प्रत्येक प्रवाशाने हात सॅनिटाईझ केल्यावरच बसमध्ये प्रवेश करायचा आहे. सुरक्षेबाबत सर्व खबरदारी घेऊन आम्ही पूर्ण क्षमतेने बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे अनिल परब यांनी सांगितलं होतं. (MNS Sandeep Deshpande Criticizes Anil Parab on ST Buses with Full capacity)
संबंधित बातम्या :
आधीच एसटी तोट्यात, कोरोनाने तोटा वाढला, विचाराअंती पूर्ण क्षमतेने बसेस सुरु : अनिल परब
“बसच्या गर्दीत नाही, पण रेल्वेत कोरोना होतो का?” संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला सवाल