“रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?”

राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन, कडक निर्बंध यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णामध्ये घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (MNS On Maharashtra Corona Patient Decrease)

रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 8:43 AM

मुंबई : राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन, कडक निर्बंध यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णामध्ये घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 37 हजार 326 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे फेब्रुवारीपासून वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला काहीसा ब्रेक लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र यावरुन मनसेने राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश अशी दुटप्पी भूमिका का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. (MNS Sandeep Deshpande On Maharashtra Corona Patient Decrease)

संदीप देशपांडे यांचे ट्वीट 

आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल,मुख्यमंत्री पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजेच रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश. अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात??? असा सवाल संदीप देशपांडेंनी केला आहे. संदीप देशपांडे यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे.

महाराष्ट्राला दिलासा, रुग्णसंख्येत घट 

राज्यात काल दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 37 हजार 326 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. विशेष म्हणजे त्याचवेळी 61 हजार 607 इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट 87 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 37 हजार 326 नवीन रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी 61 हजार 607 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 44 लाख 69 हजार 425 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते असून सध्या हे प्रमाण 86.97 टक्के इतके झाले आहे.

राज्यात काल कोरोनामुळे 549 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोना मृत्यूदर 1.49 टक्के इतका आहे. आतापर्यंत कोरोनाच्या 2 कोटी 96 लाख 31 हजार 127 चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. त्यातील 51 लाख 38 हजार 973 चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण 17.34 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 36 लाख 70 हजार 320 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 26 हजार 664 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. (MNS Sandeep Deshpande On Maharashtra Corona Patient Decrease)

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘कोविडॉलॉजिस्ट’, त्यांचे हात मजबूत करणे प्रत्येकाचे कर्तव्य, शिवसेनेकडून स्तुती

‘लसीकरणात ठाण्याला झुकते माप, डोंबिवलीकरांशी दुजाभाव; हे राजकारण नाही तर काय?’

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.