बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं पण…, मनसेचे जोरदार टीकास्त्र

| Updated on: Nov 23, 2020 | 9:06 AM

बेरोजगारी, वीजबिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं मात्र तसं काहीच झालं नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.

बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं पण..., मनसेचे जोरदार टीकास्त्र
sandeep deshpande on cm uddhav thackeray
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या संबोधनातून त्यांनी कोरोनाची दुसरी लाट, कार्तिकी वारी, पोस्ट कोव्हिडचे परिणाम यांसह अनेक विषयांवर मते मांडली. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर मनसेने जोरदार टीकास्त्र सोडलंय. बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं मात्र तसं काहीच झालं नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली. (MNS Sandeep Deshpande Slam Cm Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधला. दिवाळीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार असल्याने ते काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. वाढीव विजबीलासारखा ऐरणीवर असलेल्या विषयावर मुख्यमंत्री बोलणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यावर बोलणं टाळलं, असं देशपांडे म्हणाले.

कोरोनाने संकट टळलेलं नाही असं सांगतानाच इतर राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील लोकांनीही शिस्त पाळली पाहिजे नाहीतर आपल्यालाही कडक पावले उचलावी लागतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊनच्या संकेतावर बोलताना ‘जनता प्रचंड अस्वस्थ आहे, चिडलेली आहे त्याचा उद्रेक होवू नये म्हणून लॉकडाऊनची भिती दाखवली जात आहे’, असं देशपांडे म्हणाले.

सगळं सुरु करतो, जबाबदारी घेता का?, मुख्यमंत्र्यांनी सुनावले

कोरोनाच्या विषयावर मला कोणतंही राजकारण करायचं नाही. पण काही लोकांचं हे उघडा ते उघडा असं सुरू आहे. मी सर्व काही सुरू करायला तयार आहे. काही झालं तर त्याची जबाबदारी घेता का?, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढी जबाबादारी माझ्यावर आहे. तेवढी जबाबदारी हे उघडा ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. योग्यवेळी एकाएका गोष्टीतून तुमची सुटका करणार असल्याचं मी सांगितलं होतं. त्यानुसार धार्मिकस्थळं उघडी करण्यात आली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. ते योग्य नाही. तुम्ही गर्दी करू नका. कोरोनाचं संकट संपलेलं नाही. याचं भान ठेवा, असं आवाहनही त्यांनी केलं.

(MNS Sandeep Deshpande Slam Cm Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

पोस्ट कोव्हिडचा नवीन प्रकार गंभीर, मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं अलर्ट

CM Uddhav Thackeray | करायचं ठरवलं की महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे