विधानसभेसाठी मनसेला सोबत घ्या, महाआघाडीच्या बैठकीत सर्वांचाच सूर

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तयारी सुरु झाली आहे. महाआघाडीतील प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. यामध्ये मनसेला सोबत घेण्यासाठी सर्वांचंच एकमत झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हा सूर काँग्रेस राष्ट्रवादीसह स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि सपाचे आमदार अबू आझमी यांचाही होता. राज ठाकरे यांना बरोबर […]

विधानसभेसाठी मनसेला सोबत घ्या, महाआघाडीच्या बैठकीत सर्वांचाच सूर
Follow us
| Updated on: May 28, 2019 | 6:17 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तयारी सुरु झाली आहे. महाआघाडीतील प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. यामध्ये मनसेला सोबत घेण्यासाठी सर्वांचंच एकमत झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हा सूर काँग्रेस राष्ट्रवादीसह स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि सपाचे आमदार अबू आझमी यांचाही होता.

राज ठाकरे यांना बरोबर घ्यावं अशी मागणी बैठकीत झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मनसेला विरोध केला होता. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेण्यासाठी चर्चा करावी असंही मत बैठकीत मांडण्यात आलं. राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावं अशी मागणी झाली.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीला लवकरात लवकर मूर्त रुप देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, याअगोदर राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचंही राजू शेट्टी यांनी सांगितलं होतं. लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजपविरोधात प्रचार केला होता. राजू शेट्टींच्या मतदारसंघातही राज ठाकरेंची सभा झाली होती.

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील छोटे-मोठे 56 पक्ष भाजपविरोधात एकत्र आले होते. सर्व पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपविरोधात रणशिंग फुंकलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने 48 पैकी 41 जागा जिंकल्या. काँग्रेसला केवळ एक जागा मिळवता आली, तर राष्ट्रवादीने पाच जागांवर विजय मिळवला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.