मनसे आता राज्यपलांच्या भेटीसाठी राजभवनावर

मनसेचं शिष्टमंडळ बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेणार आहे.

मनसे आता राज्यपलांच्या भेटीसाठी राजभवनावर
Follow us
| Updated on: Nov 20, 2019 | 8:05 AM

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजभवनावर जाणार आहे. शेतकरी प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मनसेचं शिष्टमंडळ बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट (MNS to Meet Governor) घेणार आहे.

मनसे आज दुपारी पावणेबारा वाजताच्या सुमारास राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेणार आहे. या भेटीत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी ते राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चार दिवसांपूर्वी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. ‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तात्काळ वितरित करण्यात यावा’, अशी मागणी फडणवीसांनी केली होती.

मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याची विनंतीही फडणवीसांनी केली होती.

राज्यपालांकडून मदतीचा हात

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खरीप पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजार रुपयांची तर फळबागांसाठी हेक्टरी 18 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

याशिवाय परीक्षा शुल्क आणि शेतसारा माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. राज्यपालांनी तातडीने मदत वाटप करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला दिले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. मात्र तूर्तास शेतकऱ्यांना सरकारने किंचितसा दिलासा दिला आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्याची सर्व सूत्रं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (MNS to Meet Governor) यांच्या हातात गेली आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हातमिळवणी करत ‘महासेनाआघाडी’ स्थापन करुन सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी या तिन्ही पक्षांनी गेल्या शनिवारी राज्यपालांकडे भेटीची वेळही मागितली होती. परंतु ही भेट तूर्तास लांबणीवर पडली. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच अद्यापही कायम आहे.

सत्तासंघर्ष कसा चालला?

राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सर्वात आधी मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र भाजपने शिवसेनेची इच्छा नसल्याचं रविवारी (10 नोव्हेंबर 2019) सत्तास्थापनेचा दावा करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष शिवसेनेला आवताण दिलं होतं.

शिवसेनेने सोमवारी रात्री (11 नोव्हेंबर 2019) राज्यपालांची भेट घेऊन, सत्तास्थापनेचा दावा केला. शिवसेनेला पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागली. मात्र दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडच्या बैठकांचं सत्र सुरु होतं. त्यातच झालेल्या दिरंगाईमुळे शिवसेनेला केवळ सत्तास्थापनेचा दावा करता आला, मात्र बहुमतासाठी लागणारी दोन्ही पक्षांची पाठिंबा पत्रं राज्यपालांकडे सादर करता आली नाहीत. आवश्यक संख्याबळ दाखवण्यासाठी शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ मागितला. पण राज्यपालांनी त्याला नकार दिला.

राज्यपालांनी लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसला मंगळवारी रात्री (12 नोव्हेंबर 2019) 8.30 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र त्याआधी राष्ट्रवादीनेही मुदतवाढ मागितली. परंतु राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही वेळ वाढवून देण्यास नकार देत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीने मंगळवार 12 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

MNS to Meet Governor

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.