… अन्यथा मनसे स्टाईल दणका निश्चित, मनसेचा एमआयएमला इशारा
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेवर टीका केल्यानंतर मनसेने एमआयएमला इशारा दिला आहे (MNS warn MIM ).
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पहिल्या अधिवेशनात घेतलेल्या नव्या भूमिकेवर जोरदार चर्चा सुरु आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेवर टीका केली. यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एमआयएमला इशारा दिला आहे (MNS warn MIM ).
एमआयएमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावं. राज ठाकरे यांच्याबद्दल हिन दर्जाची टीका सहन केली जाणार नाही. अशी टीका झाली तर मनसे दणका दिला जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे. याबाबत मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर बाळा नांदगावकर यांचा एक व्हिडीओ पोस्ट करुन मनसेची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
“एमआयएमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावं. राजसाहेबांबद्दल हिन दर्जाची टीका सहन केली जाणार नाही. पुन्हा हि आगळीक झाली तर #मनसेदणका निश्चित. तो दणका कसा असतो हे त्या अबू आझमीला विचारा…” – मनसे नेते @BalaNandgaonkar pic.twitter.com/TBtyK1UmjP
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 25, 2020
बाळा नांदगावकर म्हणाले, “इम्तियाज जलील चूकून लॉटरी लागल्याने खासदार झाले आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं. या महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या नादाला लागायचं नाही हे आत्ताच लक्षात ठेवा. पाहिजे तर आबू आझमींना विचारा. आमच्या अंगावर येऊ नका, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ. तुम्ही प्रयत्न करुन तर पाहा, मग तुम्हाला कळेल. आमच्या नादाला लागायच्या फंदातही पडू नका, नाहीतर खूप महागात पडेल.”
“ओवेसी औरंगाबादला नाचले, त्यांना नाचा बोलू का?”
बाळा नांदगावकर यांनी जलील यांच्या राज ठाकरेंवरील टीकेचाही चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, “एन्टरटेनर कुणाला म्हणता? तुमचे असदुद्दीन ओवेसी औरंगाबादला नाचले. त्यांना आम्ही नाचा बोलू का? ते एन्टरटेन करतात. तुमच्या पक्षाचे भायखळ्याचे आमदार वारिस पठाण गणपती बाप्पा मोरया बोलले म्हणून त्यांना माफी मागायला लावली. ही तुमच्या पक्षाची भूमिका आहे. तुम्हाला मतं पाहिजेत? आमच्या अंगावर येऊ नका, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ.”
हैदराबादमधून आला आहात तर हैदराबादमध्येच राहा. इकडं नाही ते नाटक करायचं नाही. राज ठाकरे यांच्याविषयी तुम्ही परत बोलला तर ते तुम्हाला अडचणीचं ठरेल, असाही इशारा नांदगावकर यांनी दिला.