“सुषमाताई, बाळासाहेबांची नाक घासून माफी कधी मागणार?”, मनसेचं अंधारेंना पत्र

मनसेचं सुषमा अंधारेंना पत्र...

सुषमाताई, बाळासाहेबांची नाक घासून माफी कधी मागणार?, मनसेचं अंधारेंना पत्र
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 9:37 AM

मुंबई : ‘सुषमा अंधारे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची नाक घासून माफी कधी मागणार?’, असं पत्र मनसेने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना लिहिलं आहे. अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरेंबाबत ‘ म्हाताऱ्याच्या हातात तलवार देवून काय उपयोग?’, असं वक्तव्य केल्याचा दावा करत मनसे सचिव प्रवक्ते योगेश खैरे यांनी पत्र लिहिलं आहे.

योगेश खैरे यांचं पत्र तश्यास तसं

सुषमाताई अंधारे….!

आपण वारकरी संप्रदायाची तोडकी मोडकी माफी मागितलीत! आता समस्त हिंदू समुदायाची, महिला भगिनींची आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची माफी कधी मागणार ??

संत परंपरा हे महाराष्ट्राचं वैभव आहे…. आक्षेपार्ह हावभाव आणि हीन वक्तव्य करत या परंपरेचा तुम्ही अपमान केला होता. पण ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ या संतांच्या शिकवणूकीनुसार वारकरी संप्रदायाने केलेल्या प्रहारामुळे तुम्ही माफी मागितलीत…. पण तीही तोडकी मोडकीच होती! ती मान्य करायची की नाही हे संप्रदायच ठरवेल !! असो….

त्याचप्रमाणे हिंदू देवता, हिंदू परंपरा, वंदनीय बाळासाहेब यांच्याबाबत सुद्धा तुम्ही अशीच भाषा वापरली आहे. प्रभू राम, श्रीकृष्ण, हनुमान या देवता असतील किंवा नवरात्री सारखे हिंदू धार्मिक सण ज्यात महिला भगिनींच्या भावना आणि आस्था गुंतल्या आहेत त्याचाही तुम्ही टिंगल टवाळी करत अपमान केला! वंदनीय बाळासाहेबांबाबत ‘म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग आहे ?’ असं अपमानस्पद वक्तव्य सुद्धा केलं होतं !

त्यामुळे आता समस्त हिंदू समुदायाची, महिला भगिनींची तुम्ही माफी मागणार आहात का नाही ? वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची तर तुम्ही त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नाक घासून माफी मागायला पाहिजे…. ती कधी मागणार? खरंतर अशी माफी मागण्यासाठी शिवसैनिक आपल्या नेतृत्वाकडे आग्रह का धरत नाहीत याचंच आश्चर्य वाटतं !!

‘मी एकदा केलेलं वक्तव्य परत माघारी घेत नाहीत’ असं आपण म्हणाल्याचं ऐकण्यात आलं होतं…… पण तरीही अशा अपमानस्पद, भावना दुखावणाऱ्या, हीन वक्तव्यांची आपण माफी मागितलीच पाहिजे !

तोडकी मोडकी नव्हे तर खुल्या मनाने माफी कधी मागताय ते सांगा !

तुमच्याच दादाहो मधील एक…….

योगेश खैरे सचिव

प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.