मोदी 3.0 मध्ये या 20 मंत्र्यांना मिळाला डच्चू ?, कोणत्या चेहऱ्यांना वगळले ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीला देश आणि विदेशातील नेते मंडळी आलेली आहेत. या तिसऱ्या टर्ममध्ये मोदींना भाजपाला स्पष्ट बहुमत मिळविता आलेले नाही. यंदा एनडीएच्या घटक पक्षांच्या मदतीने हे आघाडीचे सरकार चालवावे लागणार आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांना कॅबिनेटमधून डच्चू मिळालेला आहे. चला पाहूयात कोणा-कोणाल डच्चू मिळाला आहे.
Modi Cabinet List : नरेंद्र मोदी हे आज रविवारी ( 9 जून 2024 ) सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्या सोबत कॅबिनचे मंत्री देखील पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांचा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान पद भूषविले होते. मोदी यांच्या मंत्रिमंडळात कोणते चेहरे समाविष्ट असतील याविषयी देखील उत्सुकता लागली आहे. मोदी यांच्यासोबत 65 मंत्री शपथ घेऊ शकतात.
भाजपाने यंदा अब की बार चारसो पारचा नारा दिला होता. परंतू यंदा मोदींना चमत्कार करता आला नाही. भाजपाला एकट्याच्या बळावर बहुमत मिळविता आलेले नाही. त्यामुळे एनडीएच्या कुबड्यांवर हे सरकार चालणार आहे. त्यामुळे एनडीएच्या सहकाऱ्यांना देखील कॅबिनेटमध्ये जागा मिळणार आहे. त्यामुळे यंदा भाजपाच्या काही चेहऱ्यांना संधी मिळणार नाही हे स्पष्ट आहे. यात स्मृती इराणी यांच्यापासून राजीव चंद्रशेखर सारख्यांची नावे समाविष्ट आहेत. तर मग कोणाकोणा नव्या कॅबिनेटमधून डच्चू मिळाला आहे ते पाहूयात..
कोणत्या नेत्यांना कॅबिनेटमधून डच्चू
भाजपाच्या कॅबिनेटमधून अनेक दिग्गज मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. त्यात स्मृती इराणी, अनुराग ठाकुर, राजीव चंद्रशेखर, अजय मिश्रा टेनी, जनरल व्ही.के. सिंह, अश्विनी चौबे आणि नारायण राणे यांची नावे सामील आहेत. याच प्रकारे अजय भट्ट, साध्वी निरंजन ज्योती, मीनाक्षी लेखी, राजकुमार रंजन सिंह, आर.के.सिंह, अर्जून मुंडा, निशीथ प्रमाणिक, सुभाष सरकार, जॉन बारला, भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, भागवत कराड यांना देखील कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार नाही असे म्हटले जात आहे.
कॅबिनेटमधून विविध कारणांनी डावललेले
कॅबिनेटमधून स्थान न मिळालेल्यामध्ये काही जणांचा तर लोकसभा निवडणूकीत पराभव झाला आहे. तर काहींना यंदा भाजपाने तिकीटच दिले नाही. याशिवाय काही असेही नेते आहेत त्यांना तिकीट देखील मिळाले आणि ते जिंकले तरीही त्यांचा नंबर काही लागलेला नाही.
जिंकणारे नेते
अजय भट्ट, अनुराग ठाकूर, आणि नारायण राणे जे आपआपल्या जागांवर मोठ्या फरकाने जिंकले आहेत. तरीही त्यांना काही कॅबिनेटमध्ये स्थान मिळालेले नाही.
हरणारे नेते
आर.के.सिंह, साध्वी निरंजन, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी, राजीव चंद्रशेखर , निशिथ प्रमाणिक, अजय मिश्र टेनी, सुभाष सरकार, भारती पवार, राव साहेब दावने आणि कपिल पाटील यांचा यंदाच्या लोकसभा 2024 मध्ये पराभव झाला आहे. तिकीट कापलेले – मिनाक्षी लेखी, राजकुमार सिंह, जनरल व्ही.के.सिंह, जॉन बारला, आणि अश्विनी चौबे यांना तिकीट मिळालेले नाही.