मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांना स्थान देण्यात आलंय. केंद्रीय मंत्री म्हणून राणे यांनी आज शपथ घेतली. नारायण राणे यांना महाराष्ट्रात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी राणे यांना जोरदार टोला लागवलाय. कोण कुणाला अंगावर घेतं हे तुम्ही बघाल, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिलीय. (MP Anil Desai’s challenge to Union Minister Narayan Rane)
भाजपने त्यांना केंद्रात मंत्रिपद दिलं आहे. बघुया ते काय करतात. हा शह वगैरे काही नाही. कोण कुणाला अंगावर घेतं ते बघा तुम्ही. कोकण आणि शिवसेना हे नेहमीच समीकरण राहिलं आहे. त्यामुळे कोकणचे लोक आणि शिवसेनेते कधीही अंतर पडणार नाही, असा दावाही अनिल देसाई यांनी केलाय. दरम्यान, कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि भाजप मजबूत करण्यासाठी राणे यांनी बळ देण्यात आल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक चढउतार आले, त्याबाबत काय सांगाल असं विचारला आहे. 1999 ला मुख्यमंत्री झालो. त्यानंतर अनेक चढउतार आले. आता मोदींच्या नेतृत्वात हे पद मिळालं आहे. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावेन, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केलाय. तसंच शिवसेनेला शह देण्यासाठी तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा असल्याचं एका पत्रकाराने विचारलं. त्यावेळी कुणाला शह देण्यासाठी की अन्य कशासाठी मला मंत्री केलं हे माहिती नाही. फक्त मंत्री केलंय एवढं नक्की, असं मिश्किल उत्तर राणे यांनी यावेळी दिलं.
कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि भाजपचा अधिक प्रसार करण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. तसंच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. शिवसेनेला जोरदार राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देत शिवसेनेला जोरदार उत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान म्हणाले.
संबंधित बातम्या :
MP Anil Desai’s challenge to Union Minister Narayan Rane