मोदी यांना मतासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा मुखवटा लागतो, हा आपला विजय; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

भाजप नेते आणि पंतप्रधान वाटत असेल यंत्रणा हाताशी घेऊन पक्ष संपवता येईल. पण त्यांच्या किती पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही. माझं आव्हान आहे. निवडणूक आयुक्तांनी काल गुलामी केली.

मोदी यांना मतासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा मुखवटा लागतो, हा आपला विजय; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 3:21 PM

मुंबई : धनुष्यबाण आणि शिवसेना हे दोन्ही शिंदे गटाला मिळालेत. निवडणूक आयोगानं काल हा निर्णय दिला. त्यानंतर मातोश्रीबाहेरून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, धनुष्यबाण कुणी चोरलं हे तुम्हाला माहीत आहे. निवडणुकीत या लोकांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. योगायोग असो काही असो आज महाशिवरात्र आहे. या दिवसांचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलं. धनुष्यबाण चोरलं. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारलं आहे. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याचा स्वाद घेतला आहे. पण आता त्यांना डंख मारण्याची वेळ आली आहे. तुम्ही चिडलेला आहे. आजपर्यंत कोणताही पक्ष नसेल की त्यांच्यावर हा आघात कोसळला नसेल.

निवडणूक आयुक्तांनी गुलामी केली

भाजप नेते आणि पंतप्रधान वाटत असेल यंत्रणा हाताशी घेऊन पक्ष संपवता येईल. पण त्यांच्या किती पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही. माझं आव्हान आहे. निवडणूक आयुक्तांनी काल गुलामी केली. निवृत्त झाल्यावर ते राज्यपाल होतील. न्यायामूर्ती झाले. त्यांनी गुलामी अवतीभवती ठरवली आहे. गुलामांना आव्हान आहे. शिवसेना कुणाची. शिवसेना ही जनतेला ठरवू द्या. यांचा डाव सुरू आहे. यांना ठाकरे नाव पाहिजे. बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे. पण ठाकरे कुटुंब नको. त्यावेळी मोदींची नाव घेऊन मते मागितल्याचं सांगत होता. तेव्हा युती होती. एक जमाना होता लोक मोदींचे मुखवटे घालू यायचे. आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून मते मागावी लागत आहेत.

मी मशाल घेऊन येतो

मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालवा लागतो हा आपला मोठा विजय आहे. महाराष्ट्रातील जनतेला असली नकली कोण हे माहीत आहे. आव्हान देतोय ज्या पद्धतीने आपलं शिवसेना हे नाव चोरायला दिलं गेलं. आपला धनुष्यबाण चोराला दिला. ज्या पद्धतीने आणि कपट कारस्थानाने सुरू आहे. मशालही काढतील. माझं आव्हान आहे. धनुष्यबाण चोरणारे मर्द असेल तुम्ही धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो.

धनुष्यबाण चोरांना पेलता येणार नाही

बघू काय होते. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला. या चोरांनाही पेलता येणार नाही. हे मी सांगतो. मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्हा आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून आपण त्याच्या छाताडावर उभा राहील.

'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.