मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपमधील किरीट सोमय्या, मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोहित कंबोज देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) बुडवणार, असं म्हणत संजय राऊत यांनी कंबोजवर मोठा आरोप केलाय. पत्राचाळीचा मुद्दा आहे. ती जमीन खरेदी करणारा कंबोज आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसे तिथेच गुंतले आहेत. तिथं कंबोजचाच प्रोजेक्ट सुरु आहे, असा दावा राऊत यांनी केलाय. या आरोपांवर बोलताना कंबोज यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केलाय. ‘राऊतसाहेब हे मोदींपासून सुरु करतात ते फडणवीसांवर येऊन थांबतात. मागील पाच महिन्यात हे सरकार माझ्यासारख्या माणसासोबत लढून जिंकू शकले नाहीत, असा टोला कंबोज यांनी केलाय.
संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना मोहित कंबोज म्हणाले की, ‘राऊतांनी सुरुवात केली की मोहित कंबोजला मी ओळखत नाही. 4 सप्टेंबर 2017 ला राऊत माझ्या घरी आले होते. ते प्रत्येक वर्षी माझ्या घरी येतात. मी सांगू इच्छित नाही पण जीवनात अनेक वेळा त्यांनी माझ्याकडे पैशाबाबत मदत मागितली आणि मी त्यांची मदतही केली, असा दावा कंबोज यांनी केलाय. तसंच ‘माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की मला त्यांनी फडणवीसांसारख्या मोठ्या माणसाचा एक छोटा बॉय म्हटलं. माझा राऊतांना सवाल आहे की ते उद्धव ठाकरे यांचे ब्ल्यॅू आईड बॉय आहेत की शरद पवार यांचे? संजय राऊत यांनी आपली लॉयल्टी कुणाशी आहे ते आधी स्पष्ट करावं’, असा खोचक टोला कंबोज यांनी राऊतांना लगावलाय.
— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 15, 2022
राऊतांचा पहिला आरोप गुरु आशिष… मला राऊतांना सांगायचं आहे की शासन, प्रशासन तुमच्याकडे आहे. कुठलाही आरोप करताना तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे. तुम्ही आरोप केला की गुरु आशिष, राकेश वाधवानकडून 12 हजार कोटीची जमीन जी 1 लाख 65 हजार स्क्वेअर फुटाची आहे. म्हणजे 10 लाख रुपये प्रति स्वेअर फुट किंमतीची जमीन असेल ती मी 100 कोटीला घेतली. राऊत साहेब… 10 लाख प्रति स्वेअर फुट किंमतीची जमीन मुंबईतच काय संपूर्ण जगात कुठे आहे का? राऊत साहेब तुम्हीपण हर्बल तंबाखू किंवा बारामतीची कोणती वनस्पती खाऊन पत्रकार परिषद घेण्यास सुरुवात केली आहे का? असा सवाल कंबोज यांनी राऊतांना केला. कंबोज पुढे म्हणाले की, दुसरा मुद्दा म्हणजे माझ्या कंपनीनं 2010 मध्ये गुरु आशिष, ज्याने म्हाडाचा घोटाळा केला, त्याच्याकडून माझ्या कंपनीने जमीन खरेदी केली. त्याला मी पैसे दिले. ते माझे सगळे पैसे बुडाले. त्याची FIR ची कॉपीही माझ्याकडे आहे.
दुसरा विषय म्हणजे त्यांनी माझ्या अनेक कंपन्यांची नावं घेतलं. ते म्हणाले की या कंपनीत पैसे कुठून येतात? मी राऊत यांना चॅलेंज करतो, त्यांना खुलं आव्हान देतो. त्यांनी जी कुठली चौकशी करायची ती करावी. मी तुमच्या प्रत्येक चौकशीला सामोरं जाईल, असंही कंबोज यांनी म्हटलंय.
इतर बातम्या :