Mohit Kamboj Tweet : विद्या चव्हाणांना मोहित कंबोजांचा ‘जय श्रीराम’, हा सूचक इशारा नेमका कशाचा?

| Updated on: Aug 27, 2022 | 11:34 PM

बिल्कीस बानो प्रकरणातील 11 जणांना सोडून देण्यात आले आहे. एवढेच नाहीतर त्यांच्या सुटकेनंतर त्यांना हारतुरे घालून मिठाईही भरवण्यात आली होती. स्त्रीच्या चारित्र्यावर जर कुणी अशाप्रकारे कृत्य करीत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवला जाणार. महिलांच्या चारित्र्यावर जर कोणी हल्ला चढवला असेल तर तो कुण्याही धर्माचा असला तरी त्याला माफी नाही. अशा प्रवृत्तीला कायम विरोध असणार असे मत विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले होते.

Mohit Kamboj Tweet : विद्या चव्हाणांना मोहित कंबोजांचा जय श्रीराम, हा सूचक इशारा नेमका कशाचा?
मोहित कंबोज
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई :  (Mohit Komboj) भाजपाचे मोहित कंबोज हे नेहमी त्यांच्या ट्विटवरुन चर्चेत राहिलेले आहेत. यापूर्वीही सत्तांतरादरम्यानचे त्यांचे ट्विट चर्चेचा विषय ठरले होते. तर मध्यंतरी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर कारवाईबाबतचे ट्विट केले होते. हे प्रकरण ताजे असतानाच त्यांनी आपल्या ट्विटद्वारे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा (Vidya Chavan) विद्या यांनाच थेट आव्हान देणारे ट्विट केले आहे. विद्याताई जय श्रीराम या त्यांच्या वक्तव्यावरुन आता (Politics) राजकीय वर्तुळात नेमके काय होणार याबाबत चर्चा रंगली आहे. बिल्कीस बानो प्रकरणातील 11 जणांना सोडून देण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेत या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला होता. याबाबत विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतरच कंबोज यांचे हे ट्विट चा नेमका काय इशारा आहे हे पहावे लागणार आहे.

बिल्कीस बानो प्रकरणात राष्ट्रवादीची भूमिका काय?

बिल्कीस बानो प्रकरणातील 11 जणांना सोडून देण्यात आले आहे. एवढेच नाहीतर त्यांच्या सुटकेनंतर त्यांना हारतुरे घालून मिठाईही भरवण्यात आली होती. स्त्रीच्या चारित्र्यावर जर कुणी अशाप्रकारे कृत्य करीत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवला जाणार. महिलांच्या चारित्र्यावर जर कोणी हल्ला चढवला असेल तर तो कुण्याही धर्माचा असला तरी त्याला माफी नाही. अशा प्रवृत्तीला कायम विरोध असणार असे मत विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले होते. एवढेच नाहीतर याबाबत आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही देण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांच्या याच वक्तव्यावरुन मोहित कंबोज यांनी हे ट्विट केल्याची चर्चा आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये केवळ विद्या चव्हाण यांना जय श्रीराम एवढचं म्हटलं गेले आहे.

हे सुद्धा वाचा

मर्दाला लढायचं असेल तर मैदानात लढावे

स्त्रीचे चारित्र्य हाच तीचा धर्म आहे. त्यामुळे एखाद्या स्त्रीवर कोणी अशाप्रकारे हल्ला चढवत असेल तर त्याला माफी नाही. मग तो कोणत्याही जातीचा धर्माचा आहे हे देखील पाहिले जाणार नाही असे चव्हाण यांनी सूचित केले होते. मर्दाला लढायचं असेल तर त्यांनी अशा कुरघुड्या न करता थेट मैदनात लढावं त्यांचे हेच विधान झोंबल्याने कंबोज यांनी अशाप्रकारे ट्विट केले आहे. शिवाय यामध्ये दुसऱ्या कुण्याही व्यक्तीचे नाव नाहीतर हा सूचक इशारा केवळ विद्या चव्हाण यांच्यासाठीच आहे.

विद्या चव्हाण यांची भाजपावरही टीका

बिल्कीस बानो प्रकरणाबद्दल आक्रमक भूमिका मांडताना विद्या चव्हाण यांनी भाजप पक्षावरही हल्ला चढवला होता. रोहित पवार यांची देखील ग्रीन एकर या कंपनीतील व्यवहाराप्रकरणी प्राथमिक चौकशी ईडीकडून होऊ शकते. त्यावरुनही विद्या चव्हाण यांनी भाजपाला टार्गेट केले होते. पण याप्रकरणी मोहित कंबोज यांनी केलेले सूचक ट्विट म्हणजे पुढील काळात विद्या चव्हाण यांचीदेखील कशामध्ये चौकशी होणार का? हा सवाल उपस्थित करणारे आहे. कारण यापूर्वी अनेक ट्विटमधून कंबोज यांनी भविष्यवाणीच केली आहे. त्यामुळे त्यांचा सूचक इशारा काय हे तर वेळच ठरवेल.