Mohit Kamboj : 1 जून तुम्हारी थी, 30 जून मेरी होगी; मोहित कंबोज यांचं ट्विट तुफान व्हायरल
1 जून ही तारीख जरी महाविकास आघाडी सरकराची असली तरी 30 जून ही माझी आहे. 1 जुलै देखील उजाडू देणार नाही. लक्षात ठेवा जिथे बसून तुम्हा हा व्हिडिओ पाहत असताल त्या नेत्यांना गंगा माता आणि महादेवाची शप्पथ घेऊन सांगतो की, 30 दिवसांमध्ये तुम्हाला उत्तर दिले जाईल असे त्यांनी म्हटले होते. एका प्रकरणी मोहित कंबोज यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
मुंबई : (Shivsena) शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत भाजपाचा पहिला माणूस कॅमेरात कैद झाला होता तो (Mohit Kamboj) मोहित कंबोज. तेव्हापासून कायम चर्चेत असलेले कंबोज यांनी दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा येणार असल्याचे ट्विट केले होते. भाजप गोटातील हालचालीवर त्यांनी केलेले ट्विट हे बरेच काही सांगून जाते. पण आता त्यांनी एक जुना व्हिडिओ (Twitter) ट्विट केला असून सध्याच्या राजकीय स्थितीनुसार त्याला अधिक महत्व आले आहे. यामध्ये 1 जून ही महाविकास आघाडीची तारीख आहे पण 30 जून ही माझी तारीख असेल. यासाठी 1 जुलैदेखील उजाडून देणार नाही अशा आशयाचा तो व्हिडिओ होता. आणि सध्या 30 जून रोजीच सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांचा तो व्हडिओ हा मोठ्या प्रमाणास सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय म्हणल आहे कंबोज यांनी?
1 जून ही तारीख जरी महाविकास आघाडी सरकराची असली तरी 30 जून ही माझी आहे. 1 जुलै देखील उजाडू देणार नाही. लक्षात ठेवा जिथे बसून तुम्हा हा व्हिडिओ पाहत असताल त्या नेत्यांना गंगा माता आणि महादेवाची शप्पथ घेऊन सांगतो की, 30 दिवसांमध्ये तुम्हाला उत्तर दिले जाईल असे त्यांनी म्हटले होते. एका प्रकरणी मोहित कंबोज यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. दोन दिवसांपूर्वी फडणवीस हे मुख्यमंत्री होणारच आणि आता हा व्हिडिओने सोशल मिडियावर धूमाकूळ घातला आहे.
ट्विट मागचे सत्य काय ?
मोहित कंबोज यांनी जो व्हिडिओ ट्विट केला आहे त्याला पार्श्वभूमीही तशीच आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोहित कंबोज व त्यांच्या कंपनीतील संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. कंबोज यांच्या कंपनीने इंडियन ओव्हरसीज बॅकेकडून 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी ते कर्ज फडले नाही असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. शिवाय ज्यासाठी त्यांनी हे कर्ज घेतले होते त्यासाठीही त्याचा उपयोग केला नसल्याचा त्यांच्यावर ठपका होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली होती. त्या दरम्यान त्यांनी असा इशारा दिला होता.
सध्याच्या राजकीय घडामोडीला साजेशा व्हिडिओ
मोहित कंबोज यांनी जुना व्हिडिओ ट्विट केला असला तरी त्याला वेगळे असे महत्व आहे. कारण यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 1 जून ही तारीख जरी महाविकास आघाडी सरकराची असली तरी 30 जून ही माझी आहे. 1 जुलै देखील उजाडू देणार नाही.आणि अशीच काहीशी सध्याची स्थिती आहे. 30 जून रोजी भाजपा सत्ता स्थापनेची सर्व समीकरणे ठरवित असून 1 जुलैपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या व्हिडोओला अधिकचे महत्व आले आहे.