Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपची महत्वाची बैठक, बावनकुळे, पंकजा मुंडेंसह प्रमुख नेते उपस्थित, बैठकीत कोण-कोणत्या विषयांवर चर्चा?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रदेश कार्यालयात भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडतेय. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.

देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपची महत्वाची बैठक, बावनकुळे, पंकजा मुंडेंसह प्रमुख नेते उपस्थित, बैठकीत कोण-कोणत्या विषयांवर चर्चा?
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 10:28 PM

मुंबई : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु आहे. अधिवेशना दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर विरोधकांकडून शिंदे गट आणि भाजपच्या मंत्री, आमदारांविरोधात मोठी घोषणाबाजी केली जातेय. तर सभागृहातही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सामना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रदेश कार्यालयात भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडतेय. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. या बैठकीत अधिवेशनासह राज्यातील अनेक प्रश्नांवर चर्चेची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असलेल्या बैठकीत सध्या सुरु असलेलं विधीमंडळ अधिवेशन, मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणूक, वार्ड रचनेवर न्यायालयाची स्थगिती, ओबीसी आरक्षण अशा आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, संजय कुटे, सुरेश खाडे, गिरीश महाजन, अतुल सावे आदी मंत्री आणि नेते उपस्थित आहेत.

मेटेंच्या चालकाने 112 नंबरवर कॉल केला पण…

शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघाती मृत्यू झाला. मेटे यांचा मृत्यू अपघात की घातपात याचा तपास केला जातोय. अशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात महत्वाची माहिती दिली. विनायक मेटे यांच्या चालकाने अपघात झाल्यानंतर 112 नंबरवर कॉल केला. मात्र त्याने लोकेशन चुकीचे सांगितले. त्यामुळे यापुढे 112 नंबरवर कॉल केल्यानंतर लोकेशन दिसणार आहे, त्याबाबतची कार्यवाही करू, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. जेणेकरून मदतीसाठी कुणी फोन करताच लोकेशनच्या आधारे पोलिसांना अपघाताचं स्थळ कळलं पाहिजे, अशी यंत्रणा निर्माण केली जाईल, असं फडणवीसांनी सांगितलं.

आमदारांच्या चालकांसाठी विशेष प्रशिक्षण

येत्या बुधवारी म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी मुंबईत राज्यातील सर्व आमदारांच्या चालकांसाठी विशेष प्रशिक्षण ठेवण्यात आलंय. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेपर्यंत हे प्रशिक्षण असेल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.
पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय, यापुढे...
पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय, यापुढे....
'बॉम्ब घरात टाकून..', खोक्याला मारहाणीनंतर धमकी, वकिलांनी काय सांगितले
'बॉम्ब घरात टाकून..', खोक्याला मारहाणीनंतर धमकी, वकिलांनी काय सांगितले.
मुंबईकरांनो…लोकलनं प्रवास करताय? बघा उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?
मुंबईकरांनो…लोकलनं प्रवास करताय? बघा उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?.
'मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो', मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची
'मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो', मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची.