आज निवडणुका झाल्यास देशातलं चित्र काय? पाहा राज्यनिहाय निकाल
नवी दिल्ली : विविध सर्व्हेंमध्ये भाजपप्रणित एनडीएला मोठा फटका बसणार असल्याचं दिसतंय. एनडीए आणि यूपीए बहुमतापासून दूरच राहणार आहे. तर इतर पक्षच किंगमेकर ठरणार असल्याचं चित्र आहे. एक खाजगी न्यूज चॅनल आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, आज निवडणूक झाल्यास लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी एनडीएला 233, यूपीएला 167 आणि इतरांना 143 जागा मिळतील. एनडीए, यूपीए आणि इतरांना […]
नवी दिल्ली : विविध सर्व्हेंमध्ये भाजपप्रणित एनडीएला मोठा फटका बसणार असल्याचं दिसतंय. एनडीए आणि यूपीए बहुमतापासून दूरच राहणार आहे. तर इतर पक्षच किंगमेकर ठरणार असल्याचं चित्र आहे. एक खाजगी न्यूज चॅनल आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, आज निवडणूक झाल्यास लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी एनडीएला 233, यूपीएला 167 आणि इतरांना 143 जागा मिळतील. एनडीए, यूपीए आणि इतरांना मतांची टक्केवारी अनुक्रमे 38 टक्के, 32 टक्के आणि 30 टक्के असेल, असा अंदाज दाखवण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये एनडीएत शिवसेना आणि यूपीएत जेडीएसला ग्राह्य धरण्यात आलंय. लोकसभेसाठी बहुमताचा आकडा हा 272 आहे. 2014 ला एकट्या भाजपलाच 282 जागा मिळाल्या होत्या, तर एनडीएचा आकडा साडे तीनशेच्या आसपास होता. पण यावेळी एनडीएला बहुमतासाठी 39 जागांची गरज भासणार असल्याचं सध्या तरी दिसतंय.
महाराष्ट्रात काय होईल?
सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, आज निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात एनडीएला मोठा फटका बसत आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र लढल्यास एनडीएला 48 पैकी 20 जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी कमबॅक करत 28 जागा मिळवत असल्याचं चित्र आहे. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेना-भाजपला 25 जागांचा तोटा होत आहे. विशेष म्हणजे शिवसेना स्वतंत्र लढल्यास केवळ चार जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजप 16, शिवसेना 4, काँग्रेस 19 आणि राष्ट्रवादीला 9 जागा मिळू शकतात.
सर्व्हेनुसार, एनडीएला 38.4 टक्के, यूपीएला 42.4 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. शिवाय शिवसेनेला 11.4 टक्के आणि इतरांना 7.8 टक्के मतं मिळताना दिसत आहेत. 2014 ला मोदी लाटेत शिवसेना आणि भाजपच्या युतीने 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला दोन आणि राष्ट्रवादीला चार जागा जिंकता आल्या होत्या.
उत्तर प्रदेशात काय होणार?
आज निवडणूक झाल्यास उत्तर प्रदेशात यूपीएला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागणार आहे. तर 2014 च्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडासाफ करणाऱ्या एनडीएला केवळ 25 जागा मिळतील. सपा आणि बसपा यांच्या युतीला मोठं यश मिळताना दिसतंय. हे दोन्ही पक्ष 51 जागा जिंकणार असल्याचं सर्व्हेतून समोर आलंय. त्यामुळे एनडीएला 48 जागांचं नुकसान होतंय.
राजस्थानचा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा मूड काय सांगतो?
राजस्थानमध्ये लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. सर्व्हेनुसार, यावेळी एनडीएला 18 आणि काँग्रेसप्रणित यूपीएला सात जागा मिळू शकतात. यूपीएला 44 टक्के, एनडीएला 49.9 टक्के, तर इतरांना 6.7 टक्के मतं मिळताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत एनडीएने राजस्थानमधील सर्वच्या सर्व 25 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी सात जागा कमी होताना दिसत आहेत.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही भाजपला फटका बसतोय. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जागा कमी होणार आहेत. विशेष म्हणजे मध्य प्रदेशात जरी काँग्रेसचा काठावर विजय झालेला असला, तरी छत्तीसगडमध्ये मात्र विधानसभा निवडणुकीतला करिष्मा कायम दिसतोय. मध्य प्रदेशात एकूण 29 जागा आहेत. यापैकी 23 एनडीए, तर 06 जागा यूपीएच्या खात्यात जाताना दिसत आहेत. दुसरीकडे छत्तीसगडच्या 11 जागांपैकी 5 भाजपला, तर 6 काँग्रेसला मिळत आहेत.
बिहारमधला अंदाज काय?
एनडीए (भाजप 15, जेडीयू+एलजेपी 20) – 35
यूपीए (काँग्रेस 1, आरजेडी 4) – 05
एकूण – 40
मोदींच्या गुजरातमध्ये काय होणार?
एनडीए- 24
यूपीए- 02
एकूण – 26
गोव्याच्या दोन जागा कुणाला?
एनडीए – 01
यूपीए – 02
ममतांच्या पश्चिम बंगालमधील अंदाज
भाजप -7
यूपीए -1
टीएमसी- 34
एकूण – 42
ओदिशा
भाजप – 12
बीजेडी – 09
एकूण 21
ईशान्य भारत
एनडीए 14
यूपीए 09
एकूण 25
आसाम
एनडीए 06
यूपीए 07
इतर 01
एकूण 14
उत्तर भारतातला अंदाज काय?
(पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड)
एकूण जागा – 45
एनडीए- 26
यूपीए- 19
पंजाब
एकूण जागा – 13
एनडीए- 01
यूपीए- 12
हरियाणा
एकूण जागा – 10
एनडीए -7
यूपीए- 3
दक्षिण भारत एनडीएला पुन्हा नाकारणार?
(तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ)
एनडीए – 14
यूपीए – 69
इतर – 46
कर्नाटक
एनडीए – 14
यूपीए – 14
एकूण – 28
सर्व्हेनुसार फायनल आकडा काय असेल?
एनडीए – 233 (38 टक्के मतं)
यूपीए – 167 (32 टक्के मतं)
इतर – 143 (30 टक्के मतं)