Mosque Loudspeaker : मुंबईत नेमक्या किती मशिदींना भोंग्यासाठी परवानगी? राज ठाकरेंच्या आक्रमकतेनंतर परवानगीसाठी 1 हजारापेक्षा अधिक अर्ज

मुंबई पोलिसांनी 803 मशिदींना लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी दिली आहे. तर 1 हजार 144 मशिदींमधून लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी मागणारे अर्ज आले होते.

Mosque Loudspeaker : मुंबईत नेमक्या किती मशिदींना भोंग्यासाठी परवानगी? राज ठाकरेंच्या आक्रमकतेनंतर परवानगीसाठी 1 हजारापेक्षा अधिक अर्ज
मशिदींवरील भोंगे (प्रातिनिधीक फोटो)Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 10:26 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिलाय. आपल्या या भूमिकेवर ते आजही ठाम आहेत. राज यांनी आज एक पत्रक काढून आपली पुढील दिशा स्पष्ट केलीय. दरम्यान राज ठाकरे यांनी मशिदींविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. राज यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेची (Shivsena) चांगलीच कोंडी होत असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान राज यांनी आज काढलेल्या पत्रकात ‘प्रश्न असा आहे की, सर्व भोंगे हे अनधिकृत आहेत. भोंगेच कशाला, बहुतांश मशिदीही अनधिकृत आहेत. हे सरकार अनधिकृत मशिदीवरील भोंग्यांना (Loudspeaker on Mosque) अधिकृत परवानग्या का आणि कशी देते? आणि जर परवानगी देणारच असाल तर आम्हालाही हिंदू देवळांनाही भोगे लावण्याची परवानगी द्यायलाच हवी’, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलीय. अशावेळी मुंबईत पोलिसांनी 803 मशिदींना लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी दिल्याची माहिती एएनआयने दिलीय.

भोंग्यांच्या परवानगीसाठी किती अर्ज आणि परवानग्या किती?

‘मुंबई पोलिसांनी 803 मशिदींना लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी दिली आहे. तर 1 हजार 144 मशिदींमधून लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी मागणारे अर्ज आले होते. तर सायलेंट झोनमध्ये असलेल्या मशिदींमध्ये लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी देण्यात आलेली नाही’.

हे सुद्धा वाचा

‘प्रत्येक वार्डात 5 पेक्षा जास्त मशिदी, तेवढी मंदिरं आहेत का?’

तर, भाजप नेते मोहित कंबोज यांनी याच मुद्द्यावरुन मशिद आणि मंदिराचा मुद्दा उपस्थित केलाय. ‘मुंबई पोलिसांनी 1144 अर्जांपैकी 803 मशिदींना लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी दिली आहे! मुंबईत 227 कॉर्पोरेशन वॉर्ड, त्यामुळे प्रत्येक वॉर्डात सरासरी 5 पेक्षा जास्त मशिदी! मुंबईत प्रत्येक प्रभागात 5 मंदिरे आहेत का?’, असा सवाल कंबोज यांनी केलाय.

राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना 3 सूचना

हिंदूंच्या सणांना सायलन्स झोन, शाळा, रुग्णालय अशा सर्व प्रकारच्या अटीशर्तीच्या नावाखाली मर्यादा घालायच्या, परंतु मशिदींना कोणत्याही प्रकारच्या अटी घालायच्या नाहीत! भारतीय संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसते? म्हणूनच हिंदूंनो,

1. त्यांना आपली हनुमान चालिसा ऐकवा

2. सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत.

3. मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या १०० या क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांचा त्रासाबाबत तक्रार करावी. रोज करावी.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.