काल निवडून आलेला पोरगा 12 वेळा संसदेत बोलला, तुम्ही पहिल्या टर्ममध्ये 8 वेळा, अमोल कोल्हेंचा आढळरावांना टोला
कालचा पोरगा संसदेत निवडून आला, तो एका वर्षात बारा वेळा बोलतो आणि तीन टर्म खासदार राहिलेला पाच वर्षात 8 वेळा बोलत असेल तर हा संशोधनाचा विषय आहे, असा सणसणीत टोला खासदार कोल्हेंनी आढळराव पाटलांना लगावला.
पुणे : शिरुरचे खासदार अमोल कोल्हे हे मतदारसंघात भेटत नसल्याचा आरोप माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विरोधकांकडून सतत केला जातो. यावर माझी आणि आढळराव पाटलांची सतत भेट होत नाही त्यांना मी मतदारसंघातही भेटत नाही असं वाटत असेल. मी कोणाचा दृष्टीकोण बदलू शकत नाही, त्यामुळे मी माझं केलेलं काम सांगतो, असा टोला कोल्हेंनी आढळराव पाटलांना लगावला. (Mp Amol Kolhe taunt Shivajirao Adhalrao patil)
माझ्यावर कुणी आरोप करत असलं तर त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं. आपल्या पहिल्या टर्ममध्ये आपण संसदेत किती वेळा बोललो होतो हे आठवावं. कालचा पोरगा संसदेत निवडून आला, तो एका वर्षात बारा वेळा बोलतो आणि तीन टर्म खासदार राहिलेला पहिल्या टर्ममध्ये 8 वेळा बोलत असेल तर हा संशोधनाचा विषय आहे, असा सणसणीत टोला कोल्हेंनी लगावला.
तुम्हाला संसदेत बाजू मांडण्याचं काम आहे. बोलायचंय त्यांना बोलू द्या, आपण आपलं काम करत राहायचं, असंही कोल्हे म्हणाले. तसंच शिरुरच्या जनतेसाठी मागील एक वर्षात चांगलं काम करायला मिळालं याचा मनोमन आनंद आहे, असंही कोल्हे म्हणाले.
“रंगभूमीच्या पटलावरची भूमिका ही स्वतःला मनाप्रमाणे करता येते, मात्र राजकीय भूमिका ही मतदारांच्या मनाप्रमाणे साकारावी लागते. माझ्यातल्या अभिनेत्यावर अन्याय झालेला नाही. जेव्हा मला खरच वाटेल अभिनय करणं ही माझ्यासाठी आत्ता प्रायोरिटी आहे. आणि आत्ता मला हे करावं लागेल तेव्हा ते करण्यासाठी काही गैर आहे असं मला वाटत नाही, असंही कोल्हेंनी नमद केलं.
जोपर्यंत मी माझ्या मतदारसंघातले प्रश्न मांडण्यासाठी कुठं कमी पडत नाही, तर काय हरकत आहे एखाद्या राजकीय व्यक्तीचा व्यवसाय सगळ्यांना माहिती झाला तर, असा टोमणाही कोल्हेंनी आढळराव पाटील यांचं नाव न हाणला. (Mp Amol Kolhe taunt Shivajirao Adhalrao patil)
संबंधित बातम्या
शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पहिल्यांदाच अमोल कोल्हे आदित्य ठाकरेंची भेट
खा. अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टनंतर गुगलने ‘ती’ चूक सुधारली!