खासदार हिना गावित यांचं ते भाषण, ज्याचं मोदींनी भरसभागृहात कौतुक केलं
माझं सरकार गरिबांना समर्पित आहे, असं मोदींनी नमूद केलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदींनी यावेळी नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित आणि ओदिशाचे मोदी म्हणून ओळख असणारे प्रतापचंद्र सारंगी यांचंही कौतुक केलं.
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत धन्यवाद प्रस्ताव सादर केला. मोदींनी निवडणुकीनंतर पहिल्यांदाच संसदेत भाषण केलं. एक सशक्त, सुरक्षित राष्ट्राचं स्वप्न अनेक महापुरुषांनी पाहिलं, ते स्वप्न अधिक गतीने पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना काम करायचं आहे, असं मोदी म्हणाले. ज्यांचं कोणी नाही, अशा सर्वांसाठी सरकार आहे. माझं सरकार गरिबांना समर्पित आहे, असं मोदींनी नमूद केलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदींनी यावेळी नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित आणि ओदिशाचे मोदी म्हणून ओळख असणारे प्रतापचंद्र सारंगी यांचंही कौतुक केलं.
हिना गावित यांना सरकारच्या वतीने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्याची संधी देण्यात आली होती. यासाठी प्रताप सारंही यांचीही निवड करण्यात आली. दोघांनीही मांडलेल्या भूमिकेचं मोदींनी कौतुक केलं. हिना गावित यांचं भाषण सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सभागृहात उपस्थित होते. डॉक्टर असलेल्या हिना गावित या आदिवासी जिल्ह्याचं नेतृत्त्व करतात. त्यामुळेच त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती.
आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याबाबतही हिना गावित यांनी भाष्य केलं. भाजपने 2014 च्या तुलनेत यावेळी आरक्षित असलेल्या जास्त जागा जिंकल्या आहेत. अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या 84 पैकी 46 जागा भाजपने जिंकल्या, तर अनुसूचित जमातींसाठी आरक्षित 47 पैकी 31 जागांवरही भाजपने विजय मिळवला, असं हिना गावित म्हणाल्या.
VIDEO : हिना गावित यांचं संपूर्ण भाषण