Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रीडा विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन खासदार इम्तियाज जलील आक्रमक, स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले जाणार

स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा जलील यांनी आज दिलीय. स्वातंत्र्य दिनी झेंडावंदन करताना पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी जलील यांनी जनतेला आवाहन केलं आहे. जलील यांनी 8 ऑगस्ट रोजी याबाबत इशारा दिला होता.

क्रीडा विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन खासदार इम्तियाज जलील आक्रमक, स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले जाणार
इम्तियाज जलील, खासदार, एमआयएम
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 6:42 PM

औरंगाबाद : औरंगाबादेतील नियोजित क्रीडा विद्यापीठ पुण्यात उभारण्यात येण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. उद्या स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा जलील यांनी आज दिलीय. स्वातंत्र्य दिनी झेंडावंदन करताना पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी जलील यांनी जनतेला आवाहन केलं आहे. जलील यांनी 8 ऑगस्ट रोजी याबाबत इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचं म्हटलंय. (MP Imtiaz Jalil aggressive on sports university issue)

सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवण्यापासून पोलिसांनी रोखलं तर देसाई यांच्या मागे राहून रोष व्यक्त करणार, असा दावाही त्यांनी केलाय. तसंच जनतेनं रस्त्यावर उतरून सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. त्यामुळे औरंगाबादेत उद्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा गोंधळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशावेळी औरंगाबाद पोलीस प्रशासन काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 28 जुलैला आंदोलन

देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक क्रीडा विद्यापीठ सुरु करण्यात येत आहे. त्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातील पुण्यातून रोवण्यात आली आहे. हे क्रीडा विद्यापीठ सुरुवातीला औरंगाबाद येथे सुरु करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, विद्यमान सरकारने हे विद्यापीठ पुणे येथे हलवले. त्यानंतर आता हाच मुद्दा घेऊन एमआयएम आक्रमक झाली आहे. औरंगाबाद येथे होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्यात आल्याचा आरोप एमआयएमने केला आहे. याच मुद्द्याला घेऊन एमआयएमने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 28 जुलै रोजी आंदोलन केले होते. यावेळी आंदोलनादरम्यान एमआयएमचे नेते कार्यकर्ते तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले होते. मराठवाड्यातील खेळाडूंच्या विकासासाठी हे विद्यापीठ महत्त्वाचे मानले जात होते. मराठवाड्यातील खेळाडूंचे नुकसान होत आहे, असे एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.

अजित पवारांकडून पुण्यात क्रीडा विद्यापीठाची घोषणा

मागील वर्षी खेलो इंडिया स्पर्धेच्यावेळी औरंगाबाद शहरात राज्यस्तरीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार क्रीडा खात्याकडे सरकारनं 120 एकर जागेचा ताबाही दिला. मात्र, राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची घोषणा केली. त्यामुळे औरंगाबादेतील क्रीडा विद्यापीठाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

औरंगाबाद शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या करोडी इथं क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा खेलो इंडिया स्पर्धेच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर शासकीय पातळीवर जागेचं सर्वेक्षणही करण्यात आलं. करोडी इथं 120 एकर जागाही निश्चित करण्यात आली. ही जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची घोषणा केली. त्यामुळे औरंगाबादेतील क्रीडा विद्यापीठाच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

इतर बातम्या :

भाजप आमदाराकडून पहिल्यांदाच MIM च्या खासदाराचं कौतुक, महाराष्ट्रात चर्चेचा विषय

क्रीडा विद्यापीठावरुन एमआयएम आक्रमक, खेळाडूंसह कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

MP Imtiaz Jalil aggressive on sports university issue

भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.