खासदार नवनीत राणांकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त अनोखे गिफ्ट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत एक अनोखे गिफ्ट दिले आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. सर्वच स्तरावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ राजकीय नेते, कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल होत आहे. दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत एक अनोखे गिफ्ट दिले आहे. त्यांनी त्यांचा खासदारकीचा पहिला पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिलाय. विशेष म्हणजे नवनीत राणा यांचा पगार हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे.
फडणवीसांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी झाला. आज ते आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहेत. माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची ओळख आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाचा कोणताही गाजावाजा करु नका असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी गेली अनेक वर्षे आपला वाढदिवस साजरा करत नाही. असे असले तरीही फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकजण वर्षावर दाखल होतात. तर काही जण त्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तूही देतात.
Planted a sapling at Varsha residence this morning! ‘वर्षा‘ निवासस्थानी आज सकाळी वृक्षारोपण केले! pic.twitter.com/ylX9qSk1NB
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 22, 2019
मात्र खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट दिले आहे. नवनीत राण यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जात आपला खासदारकीचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वापरला जाणार आहे. दरम्यान यावेळी नवनीत राणा यांच्यासोबत त्यांचे पती आमदार रवी राणाही उपस्थित होते.
आपले सर्वांचे प्रीय मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis ज़ींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! ? pic.twitter.com/0g4JfdaBpg
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 22, 2019
एवढंच नव्हे तर मिसेस मुख्यमंत्री म्हणजेच अमृता फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर आपल्या कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. यात मुख्यमंत्री स्वत: अमृता फडणवीस आणि दिवीजाही सोबत दिसत आहे.