विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ, संसदेतल्या गोंधळाद्वारे विरोधकांचा प्रचार; नवनीत राणांचा हल्लाबोल
येणाऱ्या काही दिवसांत विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळे संसदेत विरोधकांचा गोंधळ सुरु आहे. याचद्वारे ते त्यांच्या पक्षाचा प्रचार करतायत, असा हल्लाबोल अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केला.
नवी दिल्ली : येणाऱ्या काही दिवसांत विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळे संसदेत विरोधकांचा गोंधळ सुरु आहे. याचद्वारे ते त्यांच्या पक्षाचा प्रचार करतायत, असा हल्लाबोल अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला. विरोधकांच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी संसद परिसरात संसदेचं कामकाम चालू द्या, अशा आशयाचे फलक हातात घेऊन लक्षवेधी आंदोलन केलं.
संसदेत जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होणं अपेक्षित, पण विरोधकांचा गोंधळच जास्त
“मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसांत विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष संसदेत गोंधळ घालून आपापल्या पक्षाचा प्रचार करतायत. या संसदेत जनतेच्या प्रश्नांवर लोकशाही पद्धतीने चर्चा होणं अपेक्षित असतं. मात्र तसं होताना दिसत नाहीय”, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.
विरोधकांनो संसदेचं कामकाज चालू द्या
“संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या संसदेत जनतेच्या प्रश्नांवर लोकशाही पद्धतीने चर्चा होणं अपेक्षित असतं. मात्र अधिवेशन सुरु झाल्यासून विरोधकांनी अधिवेशनाचं कामकाज चालू दिलेलं नाहीत. विरोधक सतत गोंधळ घालतायत. मी विरोध पक्षांना विनंती करतीय, की चर्चेत सहभागी व्हा, आपले मुद्दे संसेदत मांडा, तुमच्या प्रश्नांची उत्तरे सरकारकडून घ्या… मात्र संसदेच्या सभागृहात सारखाच गोंधळ होतोय.”
जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करावी, ही अपेक्षा
“महाराष्ट्रात एवढा मोठा महापूर आलाय… कित्येकांचे जीव गेलेत… कित्येक जणांचं नुकसान झालंय… पण याचं कुणालाही काही पडलेलं नाहीय. यावर कुणी चर्चा करत नाही… कुणी चर्चेला तयार होत नाही… कोव्हिडचा प्रसार होतोय. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे, यावरही कुणी चर्चा करत नाही. प्रश्नोत्तरे होत नाहीत… विरोधकांना फक्त राजकारण करायचंय… आपापले पक्ष, निवडणुका, हे त्यांना महत्त्वाचं वाटतंय… जनतेच्या प्रश्नांचं त्यांना काहीही पडलेलं नाहीय.”
नवनीत राणांचं लक्षवेधी आंदोलन
“संसदेचं कामकाज चालू द्या… शेतकरी, कामगार, बेरोजगार, कोरोना महामारीने पिडीत नागरिक, महापूरग्रस्त नागरिकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संसद चालणं गरजेचं आहे. मी याच आशयाचे फलक घेऊन विरोधकांना आवाहन करतीय…”
(MP Navneet Rana Attacked Opposition party Over monsoon parliament session)
हे ही वाचा :