संजय राऊतांच्या खासदारकीचा राजीनामा घ्या, नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कंगना रनौत यांच्या कार्यालयावरील बीएमसीने केलेली कारवाई चुकीची असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या.

संजय राऊतांच्या खासदारकीचा राजीनामा घ्या, नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow us
| Updated on: Sep 09, 2020 | 9:31 PM

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी (Navneet Rana Criticize Sanjay Raut) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकार सत्तेचा दुरुउपयोग करत असल्याचा आरोप नवनीत कौर राणा यांनी केला आहे. कंगना रनौत यांच्या कार्यालयावरील बीएमसीने केलेली कारवाई चुकीची असल्याचंही त्या म्हणाल्या (Navneet Rana Criticize Sanjay Raut).

त्याशिवाय, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी महिलांचा अपमान केला आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्र राज्याचा ठेका घेतला आहे का? ते वारंवार महिलांचा अपमान करत आहेत, आपली मर्यादा सांभाळा”, अशा इशारा नवनीत राणा यांनी संजय राऊतांना दिला. तसेच, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संजय राऊत यांना पाठिंबा आहे का? त्यांनी आता संजय राऊतांच्या खासदारकीचा राजीनामा मागायला पाहिजे”, असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

राज्यात कोरोना हा वाढत आहे. तर भंडारा-गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला. तेथे मुख्यमंत्री गेले नाही. त्यामुळे “मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर निघा”, असा टोलाही खासदार नवनीत राणा यांनी लगावला.

Navneet Rana Criticize Sanjay Raut

संबंधित बातम्या :

कंगना आली, सेनेचं नाक कापलं आणि घरी गेली, राणेंचा हल्ला, मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

Sharad Pawar | कंगनाला आपण अधिक महत्त्व देतोय, तिच्याकडे दुर्लक्ष करावे – शरद पवार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.