RFO दीपाली चव्हाण प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करा, खासदार नवनीत राणांची मागणी
खासदार नवनीत राणा यांनी मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी आणि उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.
मुंबई : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील RFO दीपाली चव्हाण आत्महत्येनंतर आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. नवनीत राणा यांनी दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दूर्लक्ष केलं नसतं तर दीपाली चव्हाण यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. तर खासदार नवनीत राणा यांनी मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी आणि उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.(MP Navneet Rana has demanded to file a case of murder in RFO Deepali Chavan suicide case)
RFO दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर अमरावती जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर खासदार नवनीत राणा यांनी मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी आणि उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दिपाली माझ्याकडे आली होती. तिने मला घडलेला प्रकार आणि रेकॉर्डिंग ऐकून दाखवली होती. याबाबत अधिकाऱ्यांना कळवलं. तरी सुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. महिला अधिकाऱ्यांचा मानसिक छळ केला गेला. त्यामुळे आता दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोपीवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केलीय.
रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या?
खासदार नवनीत राणा यांनी दिपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले नसते तर दीपाली चव्हाण यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केले. दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्याकडे दाद मागितली होती. तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो, असे चाकणकर यांनी म्हटलंय.
सदर माहिती जेव्हा दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत कौर राणा यांच्या कानावर घातली तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो.@TV9Marathi @saamTVnews @abpmajhatv @MiLOKMAT @LoksattaLive pic.twitter.com/nGMZ7FiKFg
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 26, 2021
दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधील माहितीचा दाखला देत नवनीत राणा यांना कोंडीत पकडले आहे. तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या खासदार नवनीत राणा या हत्येत अप्रत्यक्ष सहभागी आहेत का, असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला.
Dipali Chavan case | दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, कथित नव्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळhttps://t.co/5EfLoO5LnT#DeepaliChavan | #dipalichavan | #DeepaliChavanSuicide
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 26, 2021
संबंधित बातम्या :
साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी
साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी
MP Navneet Rana has demanded to file a case of murder in RFO Deepali Chavan suicide case