‘माझ्यामध्ये किती ताकत आहे बघाच’ : खासदार नवनीत राणा यांचे किशोरी पेडणेकर यांना प्रत्युत्तर
अमरावती : हनुमान चालीसा वाचनावरून सुरू झालेला वाद काही करता कमी होताना दिसत नाही. राज ठाकरेंपासून सुरू झालेला हा वाद आता मुंबई आणि अमरावतीत पोहचाला आहे. हनुमान चालीसावरून अमरावती विरूद्ध मुंबई शिवसेना असा कलगितुरा पहायला मिळत आहे. अमरावतीचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी, हनुमान जयंतीच्या पर्वावर उद्या सकाळी मी आणि खासदार नवनीत राणा […]
अमरावती : हनुमान चालीसा वाचनावरून सुरू झालेला वाद काही करता कमी होताना दिसत नाही. राज ठाकरेंपासून सुरू झालेला हा वाद आता मुंबई आणि अमरावतीत पोहचाला आहे. हनुमान चालीसावरून अमरावती विरूद्ध मुंबई शिवसेना असा कलगितुरा पहायला मिळत आहे. अमरावतीचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी, हनुमान जयंतीच्या पर्वावर उद्या सकाळी मी आणि खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) हनुमानाच्या मंदिरात हनुमान चालीसा वाचणार तेही भोंगा लावून असे म्हटले होते. तसेच भोंग्यांचं वाटप करणार आहोत, असं राणा यांनी ठणकावून सांगितलं होतं. तर त्यांनी यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सुद्धा हनुमान जयंतीच्या पर्वावर हनुमान चालीसा वाचली पाहिजे असं म्हटलं होतं. जर उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचत नसतील तर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू, असे म्हटले होते. या वक्त्यव्यानंतर शिवसैनिक चांगलेच भडकले असून त्यांनी राणा दाम्पत्याचा चांगलाच समाचार घेतला होता. तर रवी राणा यांच्या या आव्हानाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी सडेतोड उत्तर देताना ‘या असल्या आव्हानांना आम्ही विचारत नसल्याचे म्हटले होते. तसेच झेड सिक्युरिटी मिळाल्यापासून राणा हे जरा जास्तच आवाज करायला लागल्याचेही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले होते. त्यानंतर आता महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उत्तराला प्रत्युत्तर खासदार नवनीत राणा यांनी दिल आहे. त्यांनी माझ्यामध्ये किती ताकत आहे बघाच असं म्हटलं आहे.
मी जनतेची
उद्याला हनुमान जयंतीनिमित्त अमरावती मध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अमरावती हनुमान मंदिरा वर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. शिवाय खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे भोंगे सुद्धा देणार आहेत. त्याबरोबर जर उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचत नसतील तर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू, असे म्हटले होते. या वक्त्यव्यानंतर शिवसैनिक चांगलेच भडकले असून त्यांनी राणा दाम्पत्याचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या निशाना साधला होता. त्यानंतर नवनीत राणा यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या आरोपावरून प्रत्युत्तर दिले. नवनीत राणा यांनी, मुंबई ही कुणा एकाची नाही. मुंबईमध्ये माझा सुद्धा जन्म झाला आहे. त्यामुळे मातोश्री वर हनुमान चालीसा पठण करणार म्हणजे करणार असे प्रतिउत्तर त्यांनी किशोरी पेडणेकर यांना दिले असून उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब यांच्या विचारांचा विसर पडलेला असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मी, सुरक्षा मागत नसून मला मिळालेली आहे. मी जनतेची आहे. मात्र उद्धव ठाकरे हे ज्या मतांवर निवडून येतात त्या मतांचा त्यांना विसर पडलेला आहे.