कचऱ्याच्या ढिगारा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी, आधी संजय राऊत बोलले, आता शिंदेगटाचा पलटवार

आधी संजय राऊत यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा दाखला देत बोलले. आता शिंदेगटाच्या नेत्याने त्यावर भाष्य केलंय,

कचऱ्याच्या ढिगारा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी, आधी संजय राऊत बोलले, आता शिंदेगटाचा पलटवार
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 3:38 PM

नवी दिल्ली : कचऱ्याच्या ढिगारा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. आधी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा दाखला देत बोलले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. आता शिंदेगटाने त्यावर पलटवार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर टीका केलीय. शिंदेगटाचे खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी राऊतांच्या टीकेला उत्तर दिलंय.

संजय राऊत यांनी आम्हाला दलाल कचरा म्हटलं. तुम्ही याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर निवडून आला आहात. तुम्हाला जर मत देणारे कचरा असतील तर त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरील कोण आहात? संजय राऊत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरील घाण आहेत का?, असा सवाल शिंदेगटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेना हा एक महावृक्ष आहे. त्याचं बीज बाळासाहेब ठाकरेंनी रोवलं. महावृक्ष वाढतो,तेव्हा पालापाचोळा पडतो. तो कचरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर नेत आहेत. त्या कचऱ्यासमोर मुख्यमंत्री भाषण करतात, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेगटावर टीका केलीय. त्याला आता प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर दिलंय.

प्रतापराव जाधव यांनी नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात चाललेल्या वादावर भाष्य केलंय. नारायण राणे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना आधीपासून पाहिलं आहे. त्यामुळं त्या पद्धतीने ते बोलत असतात, अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांनी दिलीय.

केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाल्यास आनंद होईल अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांनी दिलीय. अजूनपर्यंत अधिकृत माहिती मिळालेली नाही. माध्यमांमधूनच माहिती मिळत आहे. बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळेल, अशी चर्चा आहे. माझ्या पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने करायला तयार आहे, असं प्रतापराव जाधव म्हणालेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.