‘नाचता येईना, अंगण वाकडं’ अशी सरकारची अवस्था, प्रीतम मुंडेंची टीका, ओबीसी आरक्षणावरुन घणाघात

भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. स्वत:चा दोष दाखवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम राज्य सरकार करतं. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्याचे पाप या राज्य सरकारनं केलं. जर सगळे दोष केंद्राचे असतील तर राज्य चालवण्यासाठीही केंद्राकडे द्या, असा जोरदार टोला प्रीतम मुंडे यांनी लगावलाय.

'नाचता येईना, अंगण वाकडं' अशी सरकारची अवस्था, प्रीतम मुंडेंची टीका, ओबीसी आरक्षणावरुन घणाघात
डॉ. प्रीतम मुंडे, खासदार, भाजप
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 1:15 PM

बीड : ओबीसी आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. स्वत:चा दोष दाखवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम राज्य सरकार करतं. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्याचे पाप या राज्य सरकारनं केलं. जर सगळे दोष केंद्राचे असतील तर राज्य चालवण्यासाठीही केंद्राकडे द्या, असा जोरदार टोला प्रीतम मुंडे यांनी लगावलाय. प्रीतम मुंडे आज बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (MP Pritam Munde criticizes Thackeray government over OBC reservation, farmers issue)

‘नाचता येईना, अंगण वाकडं’ असं राज्य सरकारचं काम आहे. नव्या गाड्या, बंगल्यांची डागडुजी करण्यासाठी पैसे आहेत. मात्र, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे नाहीत. रोज सकाळी पत्रकारांसमोर विचार मांडायचे आणि राजकीय टिप्पणी करायची असं काम या सरकारचं सुरु आहे. समाजातील कुठलाही वर्ग या सरकारच्य कामगिरीवर समाधानी नाही, असा घणाघात प्रीतम मुंडे यांनी केलाय.

‘बीड रेल्वेला राज्याकडून मदत नाही’

सर्वसामान्य नागरिकांनी या सरकारच्या कामगिरीवर डोळा ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवावी. बीडच्या रेल्वेला राज्य सरकारकडून मदत नाही. केवळ 19 कोटी राज्य सरकारनं दिले. केंद्राने भरपूर मदत केली आहे. राज्य सरकारनं वाटा दिला तर 2024 पर्यंत रेल्वे येईल. मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे, अशी माहिती प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.

दाद कुणाकडे मागायची? प्रीतम मुंडेंचा सवाल

राज्यात लैंगिक अत्याचाराचा मुद्दा गंभीर आहे. बीड जिल्ह्याची मान खाली जात आहे. या सरकारमध्ये दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न अनुत्तरित आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसंच पक्ष म्हणून बेदखल केलं जातं की नाही हे मला माहिती नाही. पण आज इथं कोण कुणाच्या हातचं बाहुलं आहे हे सर्वांना माहिती असल्याचा टोलाही प्रीतम मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना लगावलाय.

राज्य सरकारनं बहुजनांना अंधारात लोटलं – पंकजा मुंडे

ओबीसी आरक्षणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंगळवारी राज्य सरकारला घेरलं. ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढून संरक्षण देण्याचं राज्य सरकारचं ढोंग करत आहे, असा थेट हल्ला त्यांनी केला. त्या मुंबईत बोलत होत्या. यावेळी पंकजा म्हणाल्या की, ओबीसी आणि बहुजनांना अंधारात लोटणारा निर्णय या सरकारच्या काळात झाला. ओबीसीचं आरक्षण रद्द झालं. ओबीसीचं आरक्षण स्थगिती होण्यापासून रद्द होईपर्यंत जो कालावधी मिळाला त्यात पावलं उचलली असती, तर आरक्षण वाचलं असतं, असा दावा त्यांनी केला.

इतर बातम्या :

Breaking : अनिल परबांच्या घराबाहेर जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा राडा, घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न

नारायण राणे म्हणाले, दीपक केसरकर शेंबडे आमदार; केसरकर म्हणतात, सिंहासनाला हादरे दिले म्हणून…

MP Pritam Munde criticizes Thackeray government over OBC reservation, farmers issue

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.