प्रीतम मुंडे म्हणाल्या, जो तो उठतो मराठा आरक्षणाबद्दलच बोलतो, आता संभाजीराजेंचं पहिल्यांदाच उत्तर!

खासदार प्रीतम मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत लोकसभेत केलेल्या भाषणावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे.

प्रीतम मुंडे म्हणाल्या, जो तो उठतो मराठा आरक्षणाबद्दलच बोलतो, आता संभाजीराजेंचं पहिल्यांदाच उत्तर!
Sambhajiraje Chhatrapati_Pritam Munde
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 11:16 AM

नवी दिल्ली : खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) यांनी मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) आरक्षणाबाबत लोकसभेत केलेल्या भाषणावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी टीका केली आहे. प्रीतम मुंडे यांचं वक्तव्य विरोधात्मक आहे, असं संभाजीराजे म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. प्रीतम मुंडे यांनी काल लोकसभेत भाषण करताना, प्रत्येकजण केवळ मराठा आरक्षणाबाबत बोलत आहे, मात्र ओबीसी आरक्षणाबाबत कोणी बोलत नाही, असं म्हटलं होतं. (MP Sambhaji raje Chhatrapatis answer to BJP MP Pritam Munde over Maratha and OBC reservation on her lok sabha speech)

संभाजीराजे म्हणाले, “समाजाचा विषय मी शेवटपर्यंत नेतो ते काम माझं सुरू राहील. ओबीसी समाजासोबत आम्ही काम करतोय. ओबोसींचे अनेक नेते मला भेटले. आमच्यावर कधी लक्ष देणार असंही ते म्हणाले. आम्ही सर्व एकच आहोत”.

मी दोन तीन अमेडमेन्ट सुचवल्या आहेत. हा पहिला टप्पा आहे आरक्षण मिळवून देण्याचा. 127 व्या घटना दुरुस्तीमध्ये SEBC मध्ये आरक्षण देता येईल. या विधेयकाचं स्वागतच आहे, असंही संभाजीराजेंनी सांगितलं.

प्रीतम मुंडेंचं वक्तव्य विरोधात्मक

दरम्यान, प्रीतम मुंडे यांनी मराठा आरक्षणाबाबत जे वक्तव्य केलं आहे, ते विरोधात्मक आहे, असं संभाजीराजेंनी नमूद केलं. “ओबीसी, मराठा आणि इतर जाती एकच छताखाली राहतात. त्यांचं वक्तव्य 127 वी घटना दुरुस्तीशी संबंधित नाही. केंद्र सरकारचं कौतुक आहेच, मागास सिद्ध करण्याची संधी देत आहेत. केंद्र सरकारने जसं EWS दिले, तसे तुम्हालाही करता येईल. दंगली करणं हा काही मार्ग नाही, असं संभाजीराजे म्हणाले.

प्रीतम मुंडे काय म्हणाल्या होत्या ?

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी काल लोकसभेत भाषण केलं. 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर बोलताना त्या म्हणाल्या, “अनेक लोकांची मतं ऐकली, मी विचार करतेय, या बिलने काय साध्य केलं? तर राज्यांचे अधिकार होते, इच्छा होती, आपल्या राज्यातील OBC आणि सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासची जी सूची आहे ती त्यांनी बनवावी आणि ती मेंटेन करण्याचा अधिकार त्यांना मिळावा. ते आता साध्य होत आहे. पण मी बघतेय, इथे सगळे जण फिरुन फिरुन येतायेत आणि मराठा आरक्षणावरच बोलत आहेत, दुसरा कोणता विषयच मांडलेला मला दिसत नाही. म्हणून मला काही गोष्टी मला मांडायच्या आहेत. (संपूर्ण भाषणासाठी क्लिक करा)

संबंधित बातम्या  

सगळेजण फिरुन फिरुन येतात आणि मराठा आरक्षणावरच बोलतात, OBC चं काय? प्रीतम मुंडेंच्या भाषणातील शब्द आणि शब्द

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.