छत्रपती संभाजीराजेंची पन्नाशी, जनतेच्या सेवेची संधी मिळो, अंबाबाईला साकडं
राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा आज 50 वा वाढदिवस... | MP Sambhajiraje 50th Birthday
कोल्हापूर : राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा आज 50 वा वाढदिवस… गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी संभाजीराजेंचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. तसंच मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी संभाजीराजेंनी पुढाकार घेत सरकारला धारेवर धरुन समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरला जाऊन त्यांना खास शुभेच्छा देणार आहेत. (MP Sambhajiraje 50th Birthday, Took A Blessing Of Ambabai kolhapur)
वाढदिवसादिनी अंबाबाईचं दर्शन
वाढदिवसानिमित्त आज सकाळीच छत्रपतींनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. लोकांची सेवा करण्याचं आणखी बळ मिळू देत, असं साकडं त्यांनी अंबाबाई चरणी घातलं. दुसरीकडे सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून आज कोल्हापुरात दुर्गा परिषदेचंही आयोजन केलं गेलं आहे.
शिवशाहूंचा विचार लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध
आतापर्यंत सामाजिक आणि राजकीय माध्यमातून मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. अशीच सेवेची संधी इथून पुढेही मिळो. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कारण ठरावं. शिव शाहूंचा विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी कायम कटिबद्ध असेल. शिवशाहूंच्याप्रमाणे एक टक्का जरी काम करू शकलो तरी माझ्या जीवनाचं सार्थक होईल, अशा भावना संभाजीराजे यांनी वाढदिवसानिमित्त बोलून दाखवल्या.
देवेंद्र फडणवीस कोल्हापूरला जाणार
छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस खास कोल्हापूरला जाऊन छत्रपतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत. छत्रपतींचं निवासस्थान असलेलं न्यू पॅलेसवर आज संध्याकाळी फडणवीस हजेरी लावणार आहेत.
(MP Sambhajiraje 50th Birthday, Took A Blessing Of Ambabai kolhapur)
हे ही वाचा :
राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात
अविनाश भोसलेंचा मुलगा ईडीच्या ताब्यात, अमित भोसलेंना पुण्यावरुन मुंबईत आणलं