पराभवाला खासदार मंडलिक जबाबदार, शिवसेनेचे पराभूत उमेदवार उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार

शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांनीही शिवसेनेच्या अपयशाला खासदार मंडलिक हेच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात मंडलिकांनी युती धर्म पाळाला नसल्याचा आरोप करत त्यांची तक्रार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्याच्या तयारीत पराभूत उमेदवार असल्याचं सांगितलं जात आहे

पराभवाला खासदार मंडलिक जबाबदार, शिवसेनेचे पराभूत उमेदवार उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार
Follow us
| Updated on: Nov 02, 2019 | 9:19 AM

कोल्हापूर : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत युतीला आलेल्या अपयशाचं खापर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यावर फोडले होते (Kolhapur Vidhasabha Result). त्यानंतर आता शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांनीही शिवसेनेच्या अपयशाला खासदार मंडलिक हेच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात मंडलिकांनी युती धर्म पाळाला नसल्याचा आरोप करत त्यांची तक्रार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्याच्या तयारीत पराभूत उमेदवार असल्याचं सांगितलं जात आहे (Shivsena Kolhapur). याबाबत झालेल्या बैठकीबद्दल अधिकृतपणे बोलण्यास कुणी तयार नसलं तरी खासदार मंडलिक यांच्या विरोधात सर्व पराभूत एकवटले असून जिल्ह्यात संघटनात्म फेरबदल करण्याची मागणी उमेदवार उद्धव ठाकरेंसमोर करणार असल्याची माहिती आहे (MP Sanjay Mandlik).

काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युतीला भरभरून यश मिळालं. या निवडणुकीत शिवसेनेचे सहा, तर भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले होते. दहापैकी आठ जागा मिळवल्याने जिल्ह्यात दोन्ही पक्षांची ताकद वाढली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीने हा गड पुन्हा काबीज केला. त्यामुळे गेल्यावेळी सहा जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला यावेळी मात्र एका जागेवर समाधान मानावं लागलं. तर दोन जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी भोपळाही फोडता आलेला नाही. स्वतःच्या जिल्ह्यात युतीला आलेल्या या अपयशाला शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हेच जबाबदार असल्याचा आरोप कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला खासदार मंडलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. भाजपचा लोकांनी केलेल्या बंडखोरीमुळे मोठा फटका बसल्याचा खासदार मंडलिक यांचा आरोप आहे. एका बाजूला मित्र पक्षाकडून आरोप केले जात असताना आता खासदार मंडलिक यांच्या विरोधात स्वपक्षातील पराभूत उमेदवार देखील एकवटण्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवारांनी दिवाळी फराळाच्या निमित्ताने एकत्र येत खासदार मंडलिक यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

याविषयी सर्व पराभूत उमेदवार लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. खासदार मंडलिक यांच्या तक्रारी बरोबर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणीही ते करणार असल्याची माहिती आहे. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस वाढली आहे. त्यामुळे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावर काय तोडगा काढणार याकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांच लक्ष लागलेलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.