Sanjay Raut : गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ, संजय राऊतांचं पुन्हा बंडखोरांसाठी ट्विट, काँग्रेस-राष्ट्रवादीला विश्वासात घेतलं?
बंडखोर आमदार देखील खरे शिवसैनिकच असल्याची प्रतिक्रिया खा. राऊत यांनी दिली होती. त्यानंतर अवघ्या काही वेळात त्यांनी ट्विट करुन पुन्हा सस्पेंन्स निर्माण केला आहे. एकीकडे बंडखोर आमदारांना महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याबाबत रिझल्ट पाहिजे तिथे शिंदे यांनी चर्चेतून मार्ग निघू शकतो. त्यासाठी घरचे दरवाजे हे उघडे आहेत. उगाच का वण-वण भटकताय? एवढेच नाहीतर यापुढेचे वाक्य खूप महत्वाचे आहे.
मुंबई : बंडखोर आमदारांना घेऊन (Sanjay Raut) खा. संजय राऊत यांच्या एका वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. (State Government) महाविकास आघाडी सोडायला तयार आहोत. मात्र,यासाठी समोरासमोर चर्चेसाठी मुंबईत या.. असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. गुवाहटीमधून पत्रव्यवहार आणि ट्विट न करण्याचा सल्ला राऊतांनी (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांना दिला असला तरी त्यांनीच केलेल्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय असं ट्विट करुन कॉंग्रेस राष्ट्रवादीला त्यांनी विश्वासात घेतलं का असा सवाल पुन्हा उपस्थित राहिला आहे. सध्या बंडखोर आमदार आणि शिवसेना यांच्यात होत असलेल्या घडामोडीमुळे हे बंड कोणत्या स्थराला जाणार याची उत्सुकता लागली आहे. यामध्ये आता संजय राऊतच पुढे होऊन भूमिका निभावणार हे देखील पहावे लागणार आहे.
नेमकं काय म्हणयाचे संजय राऊतांना?
बंडखोर आमदार देखील खरे शिवसैनिकच असल्याची प्रतिक्रिया खा. राऊत यांनी दिली होती. त्यानंतर अवघ्या काही वेळात त्यांनी ट्विट करुन पुन्हा सस्पेंन्स निर्माण केला आहे. एकीकडे बंडखोर आमदारांना महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याबाबत रिझल्ट पाहिजे तिथे शिंदे यांनी चर्चेतून मार्ग निघू शकतो. त्यासाठी घरचे दरवाजे हे उघडे आहेत. उगाच का वण-वण भटकताय? एवढेच नाहीतर यापुढेचे वाक्य खूप महत्वाचे आहे. गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! यामध्येच सर्वकाही दडलेले आहे. म्हणजेच अजूनही कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार टिकवण्याबाबत राऊत हे आशादायी आहेत. तर दुसरीकडे हिंदुत्व आणि महाविकास आघाडीबरोबर घरोबा नको ही स्पष्ट भूमिका बंडखोर आमदारांची आहे. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार असल्याचे सांगत दुसरीकडे अशा आशयाचे ट्विट राऊतांनी खळबळ उडून दिली आहे.
चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत.. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 23, 2022
भाजपावर निशाना..!
बंडखोरांना घरचे दरवाडे उघडे असे म्हणत त्यांनी मवाळकी दाखवली असली तरी गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ असे म्हणत पुन्हा भाजपाच्या गुलामगिरीत जायचे का असा सवालच एकप्रकारे राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अजूनही शिवसेनेचा दोन्ही डगरीवर हात आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. राऊतांची प्रतिक्रीया आणि त्यानंतर काही वेळातच कॉंग्रेस-राष्ट्रवादीला विश्वास घेतल्याप्रमाणे केलेले ट्विट हे संभ्रमात टाकणारे आहे.
आगोदर आवाहन, पुन्हा दुसरा मार्ग
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना आवाहन केलं. ते म्हणाले, ‘ आमदारांनी आधी महाराष्ट्रात यावं. मुंबईत यावं. अधिकृतपणे मागणी करावी. त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल. पण आमदारांनी आधी मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. तिथं बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका. आपण पक्के शिवसैनिक आहात. शिवसेना सोडणार नाही, असं सांगताय. सध्याच्या सरकारविषयी तुमची भूमिका असेल तर त्या सरकारमधून महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. 24 तासात परत या, हे मी जबाबदारीनं परत सांगतोय. मी हवेत मी भूमिका मांडत नाहीये. उद्धव साहेबांसमोर बसू आणि तुमची भूमिका स्वीकारण्यासाठी आम्ही तयार आहोत.असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.