रिक्षाप्रमाणे तीन‌ चाकी सरकार चालणंही अवघड, सुजय विखे पाटलांचा महाविकास आघाडीला टोला

तीन‌ चाकी सरकार चालणेही मुश्कील असल्याने पाच वर्ष सरकार टिकूच‌ शकत नाही, असा टोला सुजय विखेंनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

रिक्षाप्रमाणे तीन‌ चाकी सरकार चालणंही अवघड, सुजय विखे पाटलांचा महाविकास आघाडीला टोला
Follow us
| Updated on: Aug 19, 2020 | 7:33 PM

अहमदनगर : भाजपचे खासदार डॉ. सुजय‌ विखे पाटील यांनी (MP Sujay Vikhe Patil Ride Auto Rikshaw) आज श्रीरामपुरात तीन चाकी रिक्षा‌ चालवून पाहिली. सुजय यांनी तीन चाकी रिक्षाची‌‌ सफर झाल्यानंतर राज्यातील‌ तीन पक्षाच्या‌ ठाकरे सरकारवर मिश्कीलपणे टीका‌ केली (MP Sujay Vikhe Patil Ride Auto Rikshaw).

तीन चाकी रिक्षा चालवणे अवघड आहे. त्यामुळे तीन‌ चाकी सरकार चालणेही मुश्कील असल्याने पाच वर्ष सरकार टिकूच‌ शकत नाही, असा टोला सुजय विखेंनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

श्रीरामपुरातील आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या‌ जनसंपर्क कार्यालयात कोरोना तपासणी केंद्राच्या‌ उद्घाटनानंतर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना रिक्षा ‌चालवण्याचा मोह झाला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या‌ तीन आसनी रिक्षात हात धुण्यासाठी पाणी आणि सॅनिटायझरची देखील व्यवस्था करण्यात आली होती. मग काय खासदार विखे पाटील यांनी तीन आसनी ‌रिक्षेतून शहरात थोडा वेळ फेरफटका मारला (MP Sujay Vikhe Patil Ride Auto Rikshaw).

तीन आसनी रिक्षा‌ चालवण्याचा अनुभव त्यांना पत्रकारांनी विचारला असता‌ हजरजबाबी सुजय‌ यांनी रिक्षाचा‌ संबध थेट राज्यातील महाविकास आघाडीशी‌ जोडला. तीन चाकी रिक्षा चालवणे एवढे सोपे नाही. रिक्षा चालवताना स्पीड कमी केला. स्पिडब्रेकर आल्यानंतरही रिक्षा‌ हळू घेतली. त्यात बसलेल्या प्रवाशांना भिती वाटत‌ होती. त्यामुळे राज्यातील तीनचाकी सरकार चालवणे देखील अवघड आहे हे लक्षात आले. त्यामुळे हे तीनचाकी‌ सरकार किती दिवस चालेल, किती स्थिर चालेल त्यात‌ बसलेले लोकं किती‌ घाबरुन आहेत हे पाहिले.

हे सरकार सर्व पातळीवर फेल झाले आहे. दूध दरवाढ करु शकले नाही. कोरोनाच्या‌ बाबतीतही हे फोल ठरले. पिकाच्या‌ नुकसानीचे पंचनामे नाहीत, अशा अनेक अडचणीत सापडलेले हे सरकार पाच वर्ष चालुच शकत नाही याचा मला विश्वास वाटतो, अशा शब्दात सुजय‌ विखे पाटील यांनी सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे.

MP Sujay Vikhe Patil Ride Auto Rikshaw

संबंधित बातम्या :

सुशांत प्रकरणाबाबत महाराष्ट्र सरकारची नेमकी भूमिका काय? अनिल परब म्हणतात…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.