मुंबई : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही भेट झाल्याची उदयनराजे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी लक्ष घालून तोडगा काढण्याची मागणी केल्याचंही ते म्हणाले. पवारांची नैतिक जबाबदारी आहे. मराठा आरक्षणावर लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.(MP Udanayaraje Sharad Pawar’s meeting on Maratha reservation issue)
शरद पवारांची भेट घेतली, मोदींची भेट घेणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उदयनराजेंना विचारला. त्यावेळी “हा प्रश्न राजकीय नाही. यात राजकारण कुणी आणू नये. हा विशिष्ट समाजाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात जे सत्तेत आहेत त्यात पाहिलं तर मराठा समाजाचे सर्वाधिक आमदार आहेत. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला हवी. ती होताना दिसत नाही. याबाबत मी पवारसाहेबांना सांगितलं की, आपल्याकडून काही मार्गदर्शन महाराष्ट्र सरकारला झालं पाहिजे. राज्यातील सरकार पवारसाहेबांमुळे. त्याची बांधणी पवारसाहेबांनीच केली. त्यामुळे पवारसाहेबांनीच मराठा आरक्षणावर मार्ग काढायला हवा”, अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे पवारांची नैतिक जबाबदारी आहे. मराठा आरक्षणावर लक्ष घालून तोडगा काढावा. मराठा आरक्षण देणार नसाल तर दिशाभूल का? एक श्वेतपत्रिका काढा. सरकारनं याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही उदयनराजेंनी केलीय. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही. वकिलांनी कोर्टात योग्य बाजू मांडली नाही. वडिलकीच्या नात्यानं पवारांनी यात लक्ष घालावं, अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल, अशा इशाराही उदयनराजे यांनी दिलाय.
“तुम्हाला करायचं नसेल तर नाही म्हणून सांगा. श्वेतपत्रिका काढा, जाहीर करा, पण ते तसं करत नाहीत. अशोक चव्हाण यांना हे समजायला हवं. त्यांना अनुभव आहे, आर्थिक, सामाजिकरित्या मराठा समाज मागे आहे. राज्याने कायदा केला आहे, श्वेतपत्रिका जारी करायला हवी, अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या :
Special Report | पुण्यात लग्न समारंभात उदयनराजे आणि रामराजेंची गळाभेट
MP Udanayaraje Sharad Pawar’s meeting on Maratha reservation issue