मोठी बातमी : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण

खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. (Udayanraje Bhosale Meet Sharad Pawar)

मोठी बातमी : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण
उदयनराजे भोसले शरद पवार
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 6:51 PM

नवी दिल्ली : खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट होणार आहे. आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही भेट होणार आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (MP Udayanraje Bhosale Meet Sharad Pawar)

उदयनराजे आणि शरद पवारांची ही भेट नेमकी कोणत्या कारणास्तव होत आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

नाना पटोले- उदयनराजे भेट 

दरम्यान अवघ्या दोन दिवसांपूर्वी उदयनराजेंनी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. नाना पटोले सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी त्यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी गेले होते. नेमक्या त्याचवेळी खासदार उदयनराजे भोसले यांची गाडी त्याच परिसरातून जात होती. तेव्हा उदयनराजेंनी नाना पटोले यांनी गाडीतून पाहिले आणि त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली.

यानंतर उदयनराजे यांनी गाडीतून उतरून थेट नाना पटोले यांनी भेट घेतली. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल उदयनराजेंनी त्यांचे अभिनंदन केले. यानंतर एकमेकांची जुजबी विचारपूस करुन हे दोन्ही नेते आपापल्या दिशांना मार्गस्थ झाले. साधारण तीन दिवसांपूर्वी ही भेट झाली होती. त्याबद्दल अनेकांना माहितीदेखील नव्हती. मात्र, आता या भेटीचे छायाचित्र समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया नेहमीप्रमाणे उंचावल्या आहेत. तसेच तर्कवितर्कांना उधाणही आले आहे. यावर नाना पटोले आणि उदयनराजे भोसले यांनी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.

जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ पुढे आश्चर्यकारक धक्के देऊ, असे नाना पटोले यांनी म्हटले होते. त्यामुळे या वक्तव्याचा आणि उदयनराजेंशी झालेल्या भेटीचा काही संबंध आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात विचारला जात आहे.

उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश 

उदयनराजे भोसले यांनी  14 सप्टेंबर 2019 ला भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप अध्यक्ष अमित शाह, जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला.

त्यानंतर निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबतच साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीचीही घोषणा केली होती. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील यांच्यात लढत झाली. उदयनराजे भोसले यांना 5 लाख 48 हजार 903 इतकी मतं मिळाली तर श्रीनिवास पाटील यांना 6 लाख 36 हजार 620 मतांसह बाजी मारली. उदयनराजेंचा तब्बल 87 हजार 717 मतांनी पराभव झाला होता.

संबंधित बातम्या :

बंदूक तुमच्या हातात होती, त्यावेळेस तुम्ही काय करत होता; उदयनराजे भोसलेंचा सवाल

सोनिया गांधींच्या घराबाहेर नाना पटोले दिसताच उदयनराजेंनी गाडी थांबवली अन्….

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.