Rahul Shewale : शिंदे गटाच्या खासदारांनी घेतली नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट, राहुल शेवाळे, भावना गवळींसह इतर खासदारांची उपस्थिती
आजपासून निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोग लवकरच घोषित करेल, असंही राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं.
नवी दिल्ली : नवी दिल्लीत आज मोठ्या घडामोडी झाल्या. राज्यसभेत मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना निरोप देण्यात आला. त्याचबरोबर नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदारांनी आज उपराष्ट्रपतींची भेट घेतली. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे म्हणाले, आम्ही उपराष्ट्रपतींचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदेंनी त्यांना पाठिंबा द्यावा, असं सांगितलं होतं. त्यानुसार आम्ही उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीश धनखड यांना पाठिंबा दिला. ते निवडून आले. बुधवारपासून ते उपराष्ट्रपदी पदाचा पदभार सांभाळतील. आज नवे उपराष्ट्रपती धनखड यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी राहुल शेवाळे यांच्यासोबत खासदार भावना गवळी व शिवसेनेचे इतर खासदार (MP) उपस्थित होते.
निवडणूक आयोग घोषणा करेल
खरी शिवसेना कोणती यावरून वाद आहेत. ठाकरे गट सक्रिय झाले आहे. त्यांनी एकनाथ शिंदे गटाचे गटनेते अधिकृत नसल्याचं म्हटलं आहे. परंतु, लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोग यासंदर्भातील निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यांना निवडणूक आयोगानं दोन्ही पक्षाला सांगितलं होतं. आम्ही वकिलांमार्फत सबमिशन केलं. जे लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली होती. आम्ही त्यांच्याकडे म्हणणं मांडलं आहे. आजपासून निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोग लवकरच घोषित करेल, असंही राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं.
विनायक राऊतांच्या तक्रारीवर लेखी उत्तर
विनायक राऊतांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवर शिंदे गटाच्या खासदारांनी उत्तर दिलं आहे. लेखी उत्तर हे लोकसभा अध्यक्षांना दिल्याच राहुल शेवाळे यांनी सांगितलं. गटनेता निवड चुकीची नाही असं म्हणण मांडलं. शिंदे गटाचे गटनेता राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिली. मावळते उपराष्ट्रपती व नवे उपराष्ट्रपती यांनीही एकमेकांची भेट घेतली.