MTNLमध्ये अभियंता ते माजी केंद्रीय मंत्री, जाणून घ्या कोण आहेत खासदार अरविंद सावंत?

अरविंद सावंत हे 1995 पर्यंत महानगर टेलिफोन निगम लिमिटेडमध्ये (एमटीएनएल) अभियंता म्हणून काम करायचे. | Shiv Sena MP Arvind Sawant Political journey

MTNLमध्ये अभियंता ते माजी केंद्रीय मंत्री, जाणून घ्या कोण आहेत खासदार अरविंद सावंत?
अरविंद सावंत, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 4:08 PM

मुंबई: काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) प्रकाशझोतात आले होते. देशात कोरोनाचे संकट असताना केंद्र सरकार क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण खेळत आहे. महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन (Oxygen) आणायला गेलेल्या एक्स्प्रेस ट्रेनला रेल्वे खात्याने चुकीच्या मार्गावर फिरवत ठेवले, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला होता. (Shiv Sena MP Arvind Sawant Political journey)

तत्पूर्वी खासदार नवनीत राणा यांच्यासोबतच्या वादामुळे अरविंद सावंत चर्चेत होते. अरविंद सावंत यांनी आपल्याला संसदेच्या आवारात धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. मात्र, अरविंद सावंत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या आरोपांची चौकशी होऊ द्या. ‘दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या’, असे प्रतिआव्हान अरविंद सावंत यांच्याकडून देण्यात आले होते. अरविंद सावंत यांनी वेळोवेळी एक प्रवक्ता म्हणून शिवसेनेची बाजू भक्कमपणे लावून धरली आहे. शिवसेनेतील जुने नेते आणि उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेते म्हणून अरविंद सावंत यांची ओळख आहे.

कोण आहेत अरविंद सावंत?

अरविंद सावंत यांचा जन्म 31 डिसेंबर 1951 रोजी झाला. त्यांनी अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयातून बीएससीची पदवी घेतली होती. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या अरविंद सावंत यांनी महाविद्यलयीन शिक्षणानंतर महानगर टेलिफोन निगम लिमिटेडमध्ये (एमटीएनएल) नोकरी केली. 1982 साली अरविंद सावंत यांनी अनुया सावंत यांच्याशी विवाह केला. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या काळात अरविंद सावंत यांनी एमटीएनएलमध्ये कामगार नेता म्हणून चांगलाच जम बसवला होता. ते MTNL च्या कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत.

अरविंद सावंत यांची राजकीय कारकीर्द

अरविंद सावंत हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसांपासून सावंत हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत. 1968 साली त्यांची शिवसेनेच्या गटप्रमुखपदी नियुक्ती झाली. या काळात अरविंद सावंत यांनी पक्षाच्या पोलिंग बुथवर बसण्यापासून अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी काही काळ स्थानिक लोकाधिकार समितीमध्येही काम केले.

अरविंद सावंत हे 1995 पर्यंत महानगर टेलिफोन निगम लिमिटेडमध्ये (एमटीएनएल) अभियंता म्हणून काम करायचे. 1995 मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकून पूर्णवेळ पक्षासाठी झोकून दिलं. 1995 साली विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वर्णी लागल्यानंतर अरविंद सावंत यांनी एमटीएनएलमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवून ते नगरसेवकही झाले. त्यानंतर ते शिवसेनेत एक-एक पायरी चढत वर गेले. 2010 मध्ये अरविंद सावंत यांना शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून बढती मिळाली.

2014 मध्ये अरविंद सावंत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. काँग्रेसचे तत्कालीन खासदार मिलिंद देवरा यांच्याविरोधात त्यांनी शड्डू ठोकला होता. त्यावेळी सावंत यांचा विजय कठीण मानला जात होता. परंतु देवरांचा तब्बल एक लाख 20 हजारांच्या मताधिक्याने पराभव करुन ते खासदारपदी निवडून आले. 2019 मध्ये पुन्हा त्यांनी मिलिंद देवरांचा एक लाखांच्या मताधिक्याने पराभव केला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत 67 वर्षीय अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर खासदारपदी पुन्हा निवडून आले . मोदी 2.0 सरकारमध्ये सावंत यांना अवजड उद्योग मंत्रालय सोपवण्यात आलं. शिवसेनेच्या वाट्याचं हे एकमेव केंद्रीय मंत्रिपद आहे. पहिल्या मोदी सरकारमध्येही हेच खातं शिवसेनेला मिळालं होतं. त्यावेळी अनंत गिते या मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. मात्र, शिवसेनने भाजपची साथ सोडल्यानंतर अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

नवनीत राणा आणि अरविंद सावंतांमध्ये शाब्दिक युद्ध

सचिन वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकारविरोधात संसदेत रान उठवणाऱ्या नवनीत राणा नुकत्याच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याशी झालेल्या वादामुळे चर्चेत आल्या होत्या. आपण ठाकरे सरकारविरोधात आवाज उठवल्यामुळे अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता.

अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत मला धमकी दिली. “तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू”, अशा शब्दात त्यांनी मला धमकावल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले होते. मात्र, अरविंद सावंत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

(Shiv Sena MP Arvind Sawant Political journey)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.