Mukhtar Naqvi : मुख्तार अब्बास नकवी पश्चिम बंगालचे नवे राज्यपाल?, भाजप खासदारानं अभिनंदनाचं ट्वीट हटविलं
भाजपचे खासदार हंसराज हंस यांनी केंद्र सरकारद्वारे मुख्तार अब्बास नकवीनं पश्चिम बंगालचे नवे राज्यपाल केल्याबद्दल अभिनंदन केलं. त्यानंतर हंसराज हंस यांनी आपलं हे ट्वीट हटविलं
नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे राज्यपाल कुणाला बनविले जाईल, हे अद्याप स्पष्ट नाही. तरीही भाजपच्या खासदारानं ट्वीट करून मुख्तार अब्बास नकवी यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलंय. खासदार हंसराज हंस यांनी केंद्र सरकारकडून मुख्तार अब्बास नकवी यांना पश्चिम बंगालचे नवे राज्यपाल (Governor) बनविले गेले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलं. त्यानंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आले. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना एनडीएनं उपराष्ट्रपती (Vice President) निवडणुकीत आपला उमेदवार बनविलं आहे. अशावेळी धनखड हे उपराष्ट्रपती झाल्यास त्यांची जागा रिक्त होईल. अशावेळी पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदासाठी मुख्तार नकवी यांचं नाव समोर आहे. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतही नकवी यांचं नाव घेतलं जात होतं. पण, एनडीएनं द्रोपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवार बनविले. यासंदर्भातील वृत्त आजतकनं दिलं आहे.
धनखड यांचा राजीनामा मंजूर
भाजपचे खासदार हंसराज हंस यांनी लिहिले की, केंद्र सरकारद्वारे मुख्तार अब्बास नकवीनं पश्चिम बंगालचे नवे राज्यपाल केल्याबद्दल अभिनंदन केलं. त्यानंतर हंसराज हंस यांनी आपलं हे ट्वीट हटविलं. जगदीप धनखड यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदावरून राजीनामा दिला आहे. हा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. मणिपूरचे राज्यपाल गणेशन यांनी सध्या पश्चिम बंगालचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आलाय.
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी 6 ऑगस्टला मतदान
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार 19 जुलैपर्यंत नामांकन अर्ज दाखल करू शकतात. नामांकन अर्जाची तपासणी 20 जुलैला होईल. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करणारा उमेदवार नामांकन अर्ज 22 जुलैपर्यंत परत घेऊ शकतात. देशाचे नवे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी मतदान होईल. उपराष्ट्रपती पदासाठी 6 ऑगस्टला सकाळी दहा ते सायंकाळी 5 वाजतापर्यंत मतदान होईल. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी मतांची मोजणी होईल. निवडणुकीचे निकालही जाहीर होतील. देशातील विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या चार दिवसांपूर्वी देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण हे स्पष्ट होईल.