“किरीट सोमय्या यांनी मराठी महिलांचा गैरफायदा घेतला, 8 तासाच्या क्लिप माझ्याकडे”

Ambadas Danve on Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांनी महिलांना ब्लॅकमेल केलं, त्यांचं शोषण केलं; अंबादास दानवे यांचे विधान परिषदेत गंभीर आरोप

किरीट सोमय्या यांनी मराठी महिलांचा गैरफायदा घेतला, 8 तासाच्या क्लिप माझ्याकडे
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 4:13 PM

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा एक कथित अश्लील व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हीडिओची विधिमंडळ अधिवेशनातही चर्चा झाली. या व्हीडिओवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानपरिषदेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विधान परिषदेत बोलताना दानवे यांनी सोमय्यांवर गंभीर आरोप केलेत.

किरीट सोमय्या यांनी मराठी महिलांचा गैरफायदा घेतला, असा आरोप दानवेंनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी मराठी महिलांचा गैरफायदा घेतला. या सगळ्या प्रकाराचे 8 तासाच्या क्लिप माझ्याकडे आहेत, असं दानवे म्हणालेत.

आपलं राज्य हे फुले, शाहू, आंबेडकरांचं आहे. जिजाऊ आणि, अहिल्यादेवी आणि सावित्रीमाईंच्या राज्यात महिलांवर अन्याय होतोय. ईडी, सीबीआयची भीती दाखवत महिलांना ब्लॅकमेल केलं जात आहे. त्यांचा गैरफायदा घेतला जात आहे. भाजप पक्षातीलच महिलांना पक्षात पद देतो, महामंडळ देतो… माझे ईडीच्या अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. सीबीआयशी संबंध आहेत, असं म्हणत महिलांचा गैरफायदा घेतला जातो, असे आरोप अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केले आहेत.

अनेक महिलांना राज्यसभा आणि विधान परिषदेत स्थान मिळवून देतो, असं म्हणत महिलांचा गैरफायदा घेतला जातो. जो पक्ष नैतिकतेचे धडे देतो. त्यात पक्षातील लोक असं वागतात. पम असं वागणारी व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे हे महत्वाचं नाही तर हा गुन्हा किती गंभीर आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. या सगळ्याबाबतचे व्हीडिओ माझ्याकडे आहेत. महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला जातोय, असं दानवे म्हणाले आहेत.

अंबादास दानवे यांनी आज सकाळीच किरीट सोमय्या यांना इशारा दिला होता. किरीट सोमय्या, नागडा तर तु झालेलाच आहे. राहीलं साहिलं आज करतो, पेन ड्राईव्ह  घेऊन येतोये. भेटुया, सभागृहात!, असा इशारा दानवे यांनी दिला होता. त्यानुसार आज विधानपरिषदेत बोलताना त्यांनी सोमय्यांवर गंभीर आरोप केलेत.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या विषयाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी होईल, असा शब्द दिला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.