राजकीय पोपटपंची करणारे आता गप्प का?; आशिष शेलार यांचा रोख कुणाकडे?

Ashish Shelar on Mumbai Mahapalika : भाजप 'एक सही भविष्यासाठी' उपक्रम राबवणार; आशिष शेलार यांची घोषणा

राजकीय पोपटपंची करणारे आता गप्प का?; आशिष शेलार यांचा रोख कुणाकडे?
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 3:01 PM

मुंबई 15 जुलै 2023: भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. ‘एक सही भविष्यासाठी’ भाजपच्या या नव्या उपक्रमावरही त्यांनी भाष्य केलं. आहे. यावेळी त्यांनी राजकीय पोपटपंची करणारे आता गप्प का आहेत? असा सवालही उपस्थित केला आहे. तसंच ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही आशिष शेलारांनी निशाणा साधला आहे.

जगात नामवंत असणारी आयआयएम 350 जागा घेऊन मंजूर झालं आहे. येणाऱ्या अधिवेशनात ते मंजूर होईल. राजकीय पोपटपंची करणारे आता गप्प का आहेत? खोट्या बातम्या लगेच सांगता मग आता बोला ना… मुंबईमधून प्रकल्प गेले तेव्हा हे गेलं, ते गेलं हे राजकीय स्वार्थपोटी सांगितलं गेलं. पण मुंबईमध्ये आयआयएम येत आहे तर सगळे गप्प का आहेत? मुंबईवर याचं पुतना मावशीसारखं प्रेम आहे, असं म्हणत आशिष शेलार यांन विरोधकांना टोका लगावला आहे.

पंतप्रधान मोदी देश घडवण्याचं काम करत आहेत. सोमवारपासून भाजप प्रत्येक कॉलेजवर विद्यार्थ्यांसाठी एक अभियान राबवणार आहे. एक सही भविष्यासाठी हा उपक्रम भाजप मुंबईत राबवणार आहे, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली आहे.

भाजप मुंबईवतीने मोदींचं आणि मोदी सरकारचं धन्यवाद आणि अभिनंदन… 65 वर्ष काँग्रेस सरकार देशात असताना मुंबईला काही मिळालं नाही. सगळ्यांची इच्छा पूर्ण केली आहे. मुंबईला IIM ची मान्यता कॅबिनेट मध्ये देण्यात आली आहे. आता पवईत असणाऱ्या NITI कॉलेजला IIM ची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

आदित्य ठाकरेंवर निशाणा

आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे नेते अदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ज्यानं कावीळ झाली आहे त्यांना सगळं पिवळंच दिसतं. आदित्य ठाकरे यांना काही होऊ नये. पण त्यांना राजकीय कावीळ झाली आहे हे खरं आहे. आदित्य ठाकरे यांनी सगळे निर्णय विद्यार्थ्याच्या विरोधात घेतले होते. ते सगळे तुघलकी निर्णय होते. आदित्य ठाकरे म्हणजे विद्यार्थ्यांचा विरोध, असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.