राज ठाकरेंच्या ‘राजगडा’समोर फेरीवाले बसणार, मुंबई महापालिकेचा निर्णय

मनसेच्या ‘राजगड’च्या खालीच आता महापालिकेने फेरीवाले बसवण्याचा निर्णय घेतला (Hawker seating outside Raj Thackeray) आहे.

राज ठाकरेंच्या ‘राजगडा’समोर फेरीवाले बसणार, मुंबई महापालिकेचा निर्णय
Follow us
| Updated on: Feb 10, 2020 | 11:31 PM

मुंबई : मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांना हटवा, अशी मागणी करत विराट मोर्चा काढणार्‍या मनसेच्या ‘राजगड’च्या खालीच आता महापालिकेने फेरीवाले बसवण्याचा निर्णय घेतला (Hawker seating outside Raj Thackeray) आहे. राजगड असलेल्या पद्माबाई ठक्कर रोडवरील कासारवाडी ते कोहिनूर स्केवेअर फुटपाथवर तब्बल 100 फेरीवाले बसवले जाणार आहेत. फेरीवाल्याच्या विरोधात मनसेने मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले होते. याच मनसेच्या ऑफिसबाहेर तसेच आजूबाजूच्या परिसरात फेरीवाले बसणार आहे.

मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून न्यायालयाच्या आदेशानुसार पावले उचलली आहेत. त्यानुसार प्रथम केलेल्या फेरीवाला क्षेत्राला लोकांच्या झालेल्या विरोधानंतर सुधारीत यादी तयार करण्यात आली. या सुधारित यादीनुसार महापालिकेने विविध विभागातील फेरीवाला क्षेत्रातील पदपथावर एक बाय एकच्या आकाराच्या जागा रंगवण्यास सुरुवात केली आहे.

यात दादर, माहिम आणि जी/उत्तर विभागामध्ये 14 रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या 14 रस्त्यांवर 1 हजार 485 फेरीवाल्यांना बसण्याची जागा निश्चित करण्यात आली (Hawker seating outside Raj Thackeray) आहे.

या ठिकाणी बसणार फेरीवाले

धारावी 60 फूट रोड : 80 फेरीवाले माहिम एम.एम.सी रोड : 50 फेरीवाले भागोजी किर रोड : 50 फेरीवाले माहीम सुनावाला अग्यारी रोड : 100 फेरीवाले शितलादेवी रोड: 150 फेरीवाले पद्माबाई ठक्कर रोड : 100 फेरीवाले एन.सी.केळकर रोड : 100 फेरीवाले एल.जे.रोड : 300 फेरीवाले सेनापती बापट मार्ग : 200 फेरीवाले व्ही.एस.मटकर मार्ग : 30 फेरीवाले बाबुराव परुळेकर मार्ग : 50 फेरीवाले भवानी शंकर रोड : 75 फेरीवाले गोखले रोड : 100 फेरीवाले पंडित सातवडेकर मार्ग : 100 फेरीवाले

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.