“साडे 3 जिल्ह्याच्या पक्षाचे नेते पंतप्रधानांवर बोलतायेत, त्यांनी आपली कारकीर्द तपासावी”

नरेंद्र मोदींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा!; भाजपच्या नेत्याचं शरद पवार यांना प्रत्युत्तर. पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर शरद पवार यांनी टीका केली. त्याला आता भाजपने उत्तर दिलं आहे.

साडे 3 जिल्ह्याच्या पक्षाचे नेते पंतप्रधानांवर बोलतायेत, त्यांनी आपली कारकीर्द तपासावी
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 9:55 AM

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात संशयाचं वादळ घोंघावू लागलं. या अशा सगळ्या संभ्रमाच्या वातावरणात शरद पवार यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला. त्यानंतर भाजपकडूनही उत्तर देण्यात आलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना उत्तर दिलं आहे. ट्विट करत त्यांनी शरद पवार यांना उत्तर दिलं आहे.

ज्या शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते पवार साहेब आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. पवार साहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजप देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात, असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर भाषण केलं. तेव्हा त्यांनी पुन्हा येण्याची भाषा केली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घेतलं असावं, म्हणून ते म्हणाले मी पुन्हा येईन म्हणालेत. त्यामुळे त्यांची अवस्थाही फडणवीसांसारखीच होईल. फडणवीस पुन्हा आले मात्र ते खालच्या पदावर आले, असं शरद पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत शरद पवार यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यांनी साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असं म्हणत राष्ट्रवादीवर टीकास्त्र डागलंय.

चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट जसंच्या तसं

ज्या शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते पवार साहेब आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत आहेत. पवार साहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजप देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात.

मोदीजी पुन्हा येणार नाहीत असं भाकीत तुम्ही केलं पण तुमचं हे भाकीत खरं होणार नाही. कारण जनता मोदीजींच्या पाठीशी कालही होती आणि आजही आहे. समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम कुणी केलं हे महाराष्ट्रातील जनतेनं तुमचं सरकार असताना पाहिलंय. त्यामुळे मोदीजींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा. बाकी परिवार बचाव पार्टीला सोबत घेऊन तुम्ही कितीही ‘ घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला तरीही देशातील जनता २०२४ मध्ये सुद्धा मोदीजी आणि भाजपला साथ देईल. याबाबत आपण निश्चिंत राहावे.

Non Stop LIVE Update
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.