मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसात दुसऱ्यांदा दिल्लीत; युती सरकारमध्ये नेमकं काय घडतंय?

CM Eknath Shinde at Delhi : भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्या दिल्लीत बैठक बोलावली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. अॅन्टी टेरर कॉन्फरन्स उद्या दिल्लीत होतेय. याला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहतील. वाचा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसात दुसऱ्यांदा दिल्लीत; युती सरकारमध्ये नेमकं काय घडतंय?
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 12:51 PM

मुंबई | 05 ऑक्टोबर 2023, गिरीश गायकवाड : दोन दिवसाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले होते. तिथे त्यांची भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. त्यांनंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. अमित शाह यांनी उद्या बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत.

आज आणि उद्या बैठका

अमित शाह यांनी उद्या एक महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला निघाले आहेत. आज गृहविभागाच्या सचिवांसोबत त्यांची बैठक होईल. अॅन्टी टेरर कॉन्फरन्ससाठी एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातलं आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. अमित शाह यांनी याबाबत थोड्या वेळा पूर्वी केलं आहे.

एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कालच पालकमंत्रिपदाचं वाटप झालेलं आहे. यात अजित पवार गटाला सात जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. यावरही या भेटीत चर्चेची शक्यता आहे. तसंच राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप रखडलेला आहे. यावरही या भेटीत चर्चेची शक्यता आहे.

राज्यातील सध्या युती सरकारमध्ये सारं अलबेल नसल्याची चर्चा आहे. अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अशातच परवा म्हणजे तीन ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते. त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. त्यातच आता आज मुख्यमंत्री शिंदे पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. दोन दिवसात होणारी ही दुसरी भेट आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.