Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांच्या पत्रानंतर दरेकरांचाही ठाकरे सरकारवर हल्लाबोल, आकडे लपवले जात असल्याचा आरोप

उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार मुंबई महापालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे. त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेनं दिला, अशा शब्दात दरेकरांनी जोरदार टोला हाणलाय.

फडणवीसांच्या पत्रानंतर दरेकरांचाही ठाकरे सरकारवर हल्लाबोल, आकडे लपवले जात असल्याचा आरोप
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 10:47 PM

मुंबई : मुंबईतील कोरोना मृत्यूची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचं अभासी चित्र उभं करणं, असं घडत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केलीय. त्यावरुन आता प्रवीण दरेकर यांनीही मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्याला उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र, उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार मुंबई महापालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे. त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेनं दिला, अशा शब्दात दरेकरांनी जोरदार टोला हाणलाय. (Pravin Darekar criticizes Thackeray government over corona situation in Mumbai)

माहिती का लपवून ठेवता?

“RTPCR चाचण्या केल्यानंतर संसर्ग दर 23.43 टक्के पर्यंत कसा गेला, हे मान्य करता मग मासिक संसर्ग दर मार्चमध्ये वाढून 11.23 टक्के आणि एप्रिलमध्ये 18.06 टक्के पर्यंत गेला, ही माहिती का लपवून ठेवता? मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे? RTPCR चाचण्या कमी करून संसर्ग दर कमी दाखविले जात असल्यासंदर्भात तसेच #Covid19 मुळे झालेले मृत्यू अन्य कारणांमुळे झाले असल्याची नोंद होत आहे, देवेंद्रजी फडणवीस यांनी ही अनियमितता आपल्या पत्रात तारखा, उदाहरणांसह उघड केली. त्याला मोघम उत्तर देत मुंबई महापालिकेनं आणखी संशय वाढवला”, असं ट्वीट दरेकरांनी केलंय.

फडणवीसांच्या पत्रात काय?

मुंबईतील कोरोना मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, असे घडत आहे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होतेय. हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.

संबंधित बातम्या :  

सर्वसामान्यांसाठी “माझा डॉक्टर्स” बनून मैदानात उतरा, आपण कोरोनाची तिसरी लाट परतवू: उद्धव ठाकरे

कोरोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा, पीआर यंत्रणांमार्फत जनतेची दिशाभूल नको: देवेंद्र फडणवीस

Pravin Darekar criticizes Thackeray government over corona situation in Mumbai

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.