शरद पवारांच्या हस्तक्षेपामुळे मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली रद्द

मुंबई पोलीस आयुक्तांनी तीन महत्त्वाचे निर्णय न विचारता घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होते. त्यामुळे त्यांनी परमवीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता

शरद पवारांच्या हस्तक्षेपामुळे मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली रद्द
Follow us
| Updated on: Jul 08, 2020 | 10:34 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्तक्षेपामुळे मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली टळल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमवीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मातोश्रीवर झालेल्या बैठकीत बदली न करण्याचा निर्णय झाला. (Mumbai CP Param Bir Singh transfer stopped as Sharad Pawar intervened)

मुख्यमंत्र्यांना न विचारताच मुंबईतील 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यांना अंधारात ठेवून वाहनांसाठी 2 किमी लक्ष्मणरेषेचा आदेश दिला होता. तसेच मुख्यमंत्र्यांना माहिती न देताच परस्परच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना शहीदाचा दर्जा देण्याचा निर्णय झाला होता.

हेही वाचा : आधी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची अडीच तास बैठक, मग तासभर मुख्यमंत्र्यांची पोलीस महासंचालकांशी चर्चा

मुंबई पोलीस आयुक्तांनी तीन महत्त्वाचे निर्णय न विचारता घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होते. त्यामुळे त्यांनी परमवीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याने परमवीर सिंग यांची बदली टळली.

हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातील चार आयुक्तांच्या बदल्यांवर राष्ट्रवादी पक्ष नाराज होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला न विचारताच बदल्यांचा निर्णय घेतला होता.

“मातोश्रीवर गेल्याने कमीपणा वाटत नाही”

“महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं म्हणत आहेत, मात्र तसं काही नाही. राज्यातील समस्यांवर आम्ही चर्चा करतो. माझी मुलाखत संजय राऊत घेत असल्यामुळे मला जवळचं ठिकाण म्हणून मी ‘मातोश्री’वर गेलो होतो. मातोश्रीवर गेल्याने कमीपणा वाटत नाही. चंद्रकांत पाटील यांना चिंता असेल, मात्र मला त्यावर भाष्य करायचं नाही” असं शरद पवार म्हणाले होते.

पारनेरचा मुद्दा छोटा

विरोधकांचं टीका करण्याचं काम आहे, मुख्यमंत्र्यांचं काम दिसत आहे, मात्र कोरोनामुळे प्राधान्य बदलले आहे, 14 ते पंधरा तास बैठक होतात, यावेळी टीका करु नये, बदलीबाबतचा काही मुद्दा नाही. पारनेर हा फार लहान प्रश्न आहे. तो काही राज्यस्तरावर परिणाम करणार प्रश्न नाही, असंही शरद पवार म्हणाले होते.

पाहा व्हिडीओ :

(Mumbai CP Param Bir Singh transfer stopped as Sharad Pawar intervened )

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.