बड्या नेत्यांचंच पारडं भारी? MCA निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यासमोर मोठी अडचण!
संदीप पाटील यांनी स्थापन केलेल्या पॅनलमध्ये शेलार-पवार गटात स्थान न मिळालेल्या क्रिकेटपटूंना स्थान देण्यात आलंय. मात्र संदीप पाटील यांच्या उमेदवारीवरच आक्षेप घेण्यात आलाय.
दिनेश दुखंडे, मुंबईः मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) निवडणुकीकडे सध्या क्रिकेट आणि राजकीय जगताचं लक्ष लागलंय. यंदा पहिल्यांदाच निवडणुकीत आशिष शेलार (Ashish Shelar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची युती झाली आहे. असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांनी नामांकन अर्ज भरलाय. तर त्यांना माजी क्रिकेटपटू संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी आव्हान दिलंय. मात्र संदीप पाटलांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
क्रिकेटपटू संदीप पाटील यांची उमेदवारीच धोक्यात आल्याची चिन्ह आहेत. पवार आणि शेलार युती झाल्यानंतर संदीप पाटील यांनी मुंबई क्रिकेट गट स्थापन केला. या गटामार्फत ते अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.
मात्र कॉन्फलिक्ट ऑफ इंट्रेस्ट च्या नियमाचा (हितसंबध) चा संदीप पाटील यांना फटका बसण्याची शक्यता आहे. MCA चे चीफ सिलेक्टर सलील अंकोला हे संदीप पाटील यांचे साडू आहेत.
MCA चे माजी सचिव संजय नाईक यांनी संदीप पाटील यांच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवलाय. MCA निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया सुरूआहे. संजय नाईक यांनी याआधी याच मुद्यावर प्रकाश टाकत तसा अर्ज केला आहे.
आशिष शेलार आणि शरद पवार हे दोन्ही राजकीय शत्रू या निवडणुकीत पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे या पॅनलमध्ये सर्वच राजकीय पक्ष सहभागी झाल्याचं चित्र आहे.
तर संदीप पाटील यांनी स्थापन केलेल्या पॅनलमध्ये शेलार-पवार गटात स्थान न मिळालेल्या क्रिकेटपटूंना स्थान देण्यात आलंय. मात्र संदीप पाटील यांच्या उमेदवारीवरच आक्षेप घेण्यात आलाय.
आता क्रिकेटपटू विरोधात राजकीय पॅनल अशा या लढतीत, कुणाचा विजय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.