“ठाकरे गटाचे 50 जण आले अन् मी एकटाच होतो…” संतोष तेलावणे यांनी मारहाणीची संपूर्ण हकीकत सांगितली…
"काल रात्री उद्धव ठाकरे गटाचे 50 जण आले. तेव्हा मी एकटाच होतो. आले आणि म्हणाले बोल आता काय बोलतो?", असं संतोष तेलावणे म्हणालेत.
मुंबई : काल म्हणजेच शनिवारी रात्री उशिरा शिंदे गटाचे कार्यकर्ते (Eknath Shinde Group) आणि शिवसैनिक एकमेकांना भिडलेत. महत्त्वाचं म्हणजे यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला. याबाबत एकनाथ शिंदेगटाचे संतोष तेलवणे (Santosh Telvane) यांची आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतली. “काल रात्री उद्धव ठाकरे गटाचे 50 जण आले. तेव्हा मी एकटाच होतो. आले आणि म्हणाले बोल आता काय बोलतो?”, असं संतोष तेलवणे म्हणालेत.
कश्यामुळे राडा?
काल रात्री झालेली मारहाण कश्यामुळे झाली? यावरही संतोष तेलवणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. गणपती विसर्जनावेळी आमची मिरवणूक चांगली झाली. आमच्या मिरवणुकीपुढे ठाकरे गट फिका पडला. त्यामुळे ही मारहाण केली गेली,असं संतोष तेलवणे यांनी म्हटलं.
हे सुद्धा वाचा