बाबा श्रीकांत शिंदे भावूक, किशोरी पेडणेकरांनी सगळंच काढलं, रुद्रांश, उद्धव, आदित्य, सुशांतसिंग… सारवासारव होणार?
उद्धव ठाकरे पायउतार झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तेव्हा श्रीकांत शिंदेंच्या मातोश्रींनी जो ढोल वाजवला होता, ते योग्य होतं का? असा सवाल किशोरी पेडणकरांनी केला.
मुंबईः दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होतेय. बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आता नातूही नगरसेवक होईल, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना चांगलंच सुनावलं. तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंनीही (Shrikant Shinde) बापाच्या नात्यातून उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र लिहिलं.. याच पत्रावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे यांचं एकच वाक्य घेऊन बसले, पण त्यानंतरचं वाक्य कुणी ऐकवतच नाही, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलंय. नातूही नगरसेवक होईल. पण त्या आधी त्याला चांगलं शिकवा, असे आशीर्वाद उद्धव ठाकरेंनी दिले, असं स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांनी दिलं.
मुख्यमंत्र्यांचा मुलगा नव्हे तर एक बाप म्हणून श्रीकांत शिंदेंनी पत्र लिहिलंय. पण त्यांनी या बाळाला कॅमेऱ्यांसमोर का घेऊन यावं? असा सवाल किशोरी पेडणेकरांनी केला.
सुशांत सिंह राजपूत हत्येवरून आदित्य ठाकरेंविरोधात एवढं रान उठवलं तेव्हा बाप म्हणून उद्धव ठाकरेंच्या मनाला काय वाटलं असेल, हा विचार आला नाही का, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं. रश्मी वहिनींना काय वाटलं असेल, तेव्हा संवेदना जागृत झाल्या नाहीत? तेव्हा या 40 पैकी एकानंही आवाज उठवला नाही…
एका अमिषामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून पायउतार केलंत. तेव्हा शरीराने ते जगात नसतील तर बाळासाहेब ठाकरेंच्या मनाला काय वाटलं असेल, असा सवाल किशोरी पेडणेकरांनी केलंय.
पाहा किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
हृदय फक्त तुम्हाला आहे का? बाकीच्यांची बंद पडलीत का, असंही किशोरी पेडणेकरांनी विचारलं…
उद्धव ठाकरे पायउतार झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तेव्हा श्रीकांत शिंदेंच्या मातोश्रींनी जो ढोल वाजवला होता, ते योग्य होतं का? असा सवाल किशोरी पेडणकरांनी केला.