जितेंद्र आव्हाडांनी गद्दार शब्द वापरला नाही, पण अजित पवारांना टोला मात्र लगावलाच; नेमकं काय म्हणाले? वाचा…
Jitendta Awhad on Ajit Pawar : जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना टोला लगावला; म्हणाले, हे एक काम आम्ही करणारच!
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलं. भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा शिंदे यांच्यासह इतर बंडखोर आमदारांनाही गद्दार म्हटलं गेलं. मात्र अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार परत येण्याची शक्यता खुद्द शरद पवार यांनीच व्यक्त केल्यामुळे अजित पवार किंवा इतर आमदारांवर गद्दारीचा शिक्का अद्याप कुणी लावलेला नाही. मात्र राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.
शब्द बदलू शकतात, पण अर्थ बदलू शकत नाही…, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी गद्दार शब्दाचा उल्लेखही न करता अजित पवार यांना टोला लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड यांची विरोधीपक्षनेते पदी राष्ट्र्वादीकडून निवड करण्यात आली आहे. त्यावर, माझी निवड केली हा पवारसाहेबांचा माझ्यावरचा विश्वास आहे. आता प्राप्त परिस्थितीमध्ये रस्त्यावर लढण्याशिवाय लोकांपर्यंत झाल्याशिवाय काही राहिले नाही ते आम्ही करणारच आहोत. आम्ही जनतेमध्ये जात लढाई लढणार आहोत, असं आव्हाड म्हणालेत.
राष्ट्रवादीत एकही पद असं नाही जे अजितदादांना कोणी नाकारू शकलं असतं. उद्या ते म्हणाले असते की शरद पवारांच्या जागी मला राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचे त्यालाही होकार दिला असता. पण त्यांनी आता जो निर्णय घेतला तो योग्य नाही, असं आव्हाडांनी म्हटलं आहे
शरद पवार आता बाहेर पडलेले बाजूला मकरंद पाटील आहेत चे कालपर्यंत अजित पवार यांच्या गटात होते ते आमच्या सोबत उपस्थित आहे. हळूहळू आमचे नेते परत येतील, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे
लवकरच सगळं चित्र स्पष्ट होईल. अजून 24 तास झालेले नाहीत. एक-एक नेता परत यायला लागला आहे. अमोल कोल्हे यांनीही ट्विट करत आपण शरद पवार साहेबांसोबत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आमचा पहिला मोहरा परत..!, असं ट्विटही आव्हाडांनी केलं आहे.
आज गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त अनेकांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर बोलताना माझा गुरु एकच आहे. त्यांचे आशीर्वाद असावे बाकी मला काही नको, असं म्हणत आव्हाडांनी गुरुपौर्णिमेवर भाष्य केलं आहे.
पूर्ण भारतातले विरोधी पक्ष खिळखिळे करायच आणि कालांतराने लोकशाही संपुष्टात आणायची हाच प्रयत्न आहे. पण आम्ही गुडघे टाकणार नाही. आजपासून नवीन लढाई सुरू झाली आहे. आम्ही जे काही निर्णय घेऊ ते ते कायदेशीर रित्या घेऊ, असा इशाराच आव्हाडांनी दिला आहे.