‘वेलारासू नावाचा राक्षस आ वासून बसलाय’, नालेसफाईवरुन शेलारांचा मुंबई महापालिकेवर हल्लाबोल
ही नालेसफाई नाही, तर हातसफाई केली आहे, अशी घणाघाती टीका शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांच्यावर केलीय.
मुंबई : राज्यात मान्सून दाखल झालाय. प्रत्येक पावसाळ्यात मुंबईची होणारी दैना सर्वांनाच माहिती आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज मुंबईतील नाल्यांची पाहणी केली. त्यावेळी शेलार यांना नालेसफाईच्या कामांवर मुंबई महापालिकेवर जोरदार हल्ला चढवला. मुंबई शहरातील 107 टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा महापौर यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शेलार यांनी शहरातील नाल्यांची पाहणी केली. ही नालेसफाई नाही, तर हातसफाई केली आहे, अशी घणाघाती टीका शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांच्यावर केलीय. (Ashish Shelar inspects nallas in Mumbai, Criticizes Mayor Kishori Pednekar and Municipal Officer)
मुंबईत नालेसफाई झालीच नाही. नाल्यात गाळ रुतलेला आहे. गाळाचं बेटं तयार झाली आहेत. नाल्यावर शेती करावी अशी झाडं-झुडपं अभी आहेत. 100 टक्के नालेसफाईचा दावा हा बिलं काढण्यासाठी आहे. मुंबईच्या नालेसफाईत आता कट आणि कमिशन दोन्ही सुरु झालं आहे. यात प्रशासनाचे अधिकारीही जबाबदार आहे. पी. वेलारासू नावाचा राक्षस पालिका अधिकारी म्हणून फिरत आहे. तो आ वासून स्वत:ची वाहवा करत आहे. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांचं त्याला समर्थन आहे, अशी घणाघाती टीका शेलार यांनी केलीय. तसंच यांना मुंबईकरांसमोर उघडं करणं हे भाजपचं काम असल्याचं शेलार म्हणालेत.
‘महापौरांचा नालेसफाईचा दावा फोल’
मुंबईकर नागरिकांच्या जीवाशी महापालिका खेळ खेळत असल्याची टीका शेलार यांनी केलीय. दरवर्षी नालेसफाई होतच नाही, परंतु पैसे काढले जातात. कोट्यवधी रुपये पाण्यात घालण्याचे काम महापालिका करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेकडून नालेसफाई 107 टक्के केली असल्याचा दावा जरी केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र नालेसफाई पाहताना तो फोल असल्याचं शेलार म्हणाले.
.@mybmc नालेसफाईच्या कामाचे मोठमोठे दावे उघडे पाडण्यासाठी मालाडच्या वलनाई नाल्याला भेट दिल्यानंतर समोर आलेले चित्र पुरेसे आहे. अद्याप नाला गाळाने भरलेला आहे. दौऱ्यात सोबत आ. @Yogeshsagar09 गटनेते @MiSPrabhakar @bmshirsat विनोद मिश्रा आणि स्थानिक नगरसेविका ही होत्या! @bjp4mumbai pic.twitter.com/YyfKB1GsLF
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 7, 2021
भाजप गटनेत्यांची महापौरांवर टीका
इतके दिवस महापौर कार्यालयात बसून नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या महापौरांना भाजपाच्या नालेसफाई पाहणीनंतर जाग आली आहे. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशीच तात्काळ नालेसफाईसाठी दौरा आखला असल्याची टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. त्याचबरोबर गजधरबंध, पीएनटी नाला, पोईसर नदी, जनकल्याण नगर नाला, वळनाई नाला, सोमैया नाला, जिजामाता नगर माहुल नाला हे सर्व नाले अद्याप गाळ, दगडमाती यांनी भरलेले आहेत. मुंबईच्या महापौर या नाल्यांचा दौरा करून 107 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करतील काय? असा प्रश्नही प्रभाकर शिंदे यांनी केलाय.
‘सचिन वाझेवर नालेसफाई कंत्राटदारांकडून पैसे वसूलीची जबाबदारी’
निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेवर नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदारांकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी होती. त्यामुळे वाझे आणि नालेसफाईच्या कामाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी आज मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ही मागणी केली. सचिन वाझेला पालिकेच्या कंत्राटदारांकडून वसुली करण्यास सांगण्यात आले होते. तशी माहिती कोर्टाच्या रेकॉर्डवर आली आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामाची आणि वाझेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
.@bjp4mumbai सांताक्रूझ येथील बेस्ट काँलनी नाल्यातील जलपर्णी अद्याप तशीच असून पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी हा नाल्यातील शेतीचा नवा प्रयोग सुरु केला की काय? असे नागरिक संतापाने विचारत आहेत. दौऱ्यात सोबत गटनेते @MiSPrabhakar व स्थानिक नगरसेविका ही होत्या! @Hetalgalabjp @bjp4mumbai pic.twitter.com/bexpXxw7p3
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 7, 2021
संबंधित बातम्या :
सचिन वाझे आणि नालेसफाईच्या कनेक्शनची चौकशी करा; आशिष शेलार यांची मागणी
Mumbai Unlock: लॉकडाऊन उठताच मुंबईत ट्रॅफिक जॅम; रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
Weather alert: येत्या दोन-तीन तासांमध्ये मुंबई आणि उपनगरात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता
Ashish Shelar inspects nallas in Mumbai, Criticizes Mayor Kishori Pednekar and Municipal Officer