गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात कॅसिनो, अधिवेशनात ठराव येणार?; शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

| Updated on: Jul 17, 2023 | 11:56 AM

Maharashtra Monsoon Session 2023 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवनेशनाला आजपासून सुरुवात, विविध विधेयक चर्चेसाठी येण्याची शक्यता, महाराष्ट्रात कॅसिनो सुरू होणार? अधिवेशनात ठरावाची शक्यता, वाचा सविस्तर...

गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात कॅसिनो, अधिवेशनात ठराव येणार?; शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Follow us on

मुंबई | 17 जुलै 2023 : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिनेशनादरम्यान विविध विधेयक मांडली जाण्याची शक्यता आहे. त्यातच गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांवर कॅसिनो सुरु करण्याचा विचार असल्याची माहिती आहे. तशा हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. या अधिवेशन काळात 24 विधेयकं मांडली जाणार आहेत. तर 6 अध्यादेश मांडले जाणार आहेत. यात कॅसिनोचाही समावेश असल्याही माहिती आहे.

महाराष्ट्र कॅसिनो अधिनियम हा कायदा 1976 पासून आहे. मात्र त्याची अधिसूचना काढण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. 1887 पासून लागू झालेला मुंबई जुगार प्रतिबंध कायदा कॅसिनोला लागू होणार नसल्याचं या कायद्यात स्पष्टपणे म्हणण्यात आलं आहे. या कायद्यात कॅसिनोसाठी लागणारी परवानगी. आकारलं जाणारं शुल्क, परवाने रद्द या नियमांचा समावेश आहे.

व्यावसायिकांकडून मागणी

गोव्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही कॅसिनो आणण्याची मागणी व्यावसायिक मागच्या काही वर्षांपासून करत आहेत. सरकारही यासाठी अनुकुल असल्याचं कळतं आहे.

मनसेची मागणी

गोवा राज्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही कॅसिनो सुरू करण्याची मागणी मनसेनं केली आहे. राज्यात कॅसिनो सुरु करा, अशी मागणी मनसेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित या आधी करण्यात आली आहे. राज्याच्या महसुलात वाढ करायची असेल आणि रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर सरकारने कॅसिनोचा विचार करावा, असं या पत्रात मनसेकडून करण्यात आलं आहे. मागच्या फेब्रुवारी महिन्यात मनसेच्या कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र लिहिलं होतं. तसंच कॅसिनो सुरु करण्याची मागी केली होती.

महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा विधेयक, महापालिका विधेयक, मुंबई महापालिका विधेयक, महाराष्ट्र माथाडी हमाल आणि श्रमजीवी कामगार विधेयक, महाराष्ट्र कॅसिनो विधेयक ही विधेयकं राज्य विधिमंडळाच्या या पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार असल्याची माहिती आहे.