उद्धव ठाकरे आज दोन भूमिकांमध्ये, त्यामुळे भाषणासाठी कान आतूरलेले : किशोरी पेडणेकर

आमच्या एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हासू म्हणजेच आनंद आहे," अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. (Mayor Kishori Pednekar on Shivsena Dussehra Melava)

उद्धव ठाकरे आज दोन भूमिकांमध्ये, त्यामुळे भाषणासाठी कान आतूरलेले : किशोरी पेडणेकर
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 6:42 PM

मुंबई : “यंदाचा दसरा मेळावा हा लक्षात राहण्यासारखा आहे. आमच्या एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हासू म्हणजेच आनंद आहे,” अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. यंदा  शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात फक्त 50 जणांच्या उपस्थितीत पार पडत आहे. कोरोना संकटामुळे दरवर्षी शिवाजी पार्कात होणारा दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित झाली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सायंकाळी सातच्या मुहुर्तावर हा मेळावा सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी महापौर किशोरी पेडणेकरांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली. (Mayor Kishori Pednekar on Shivsena Dussehra Melava)

“यापूर्वीचे बरेच दसरे असे आहेत की जे लक्षात राहण्यासारखे आहे. त्यातलाच हा एक आहे. की एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हासू म्हणजेच आनंद आहे. कोरोनामध्ये आमचे जवळचे नगरसेवक, आमदार, शिवसैनिकांचे निधन झाले. त्यामुळे आसू आहेत,” असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

“तर आज पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संबोधित करणार आहे. ते मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख या दोन भूमिकांमध्ये असणार आहेत. त्यामुळे आमचे कान आतूरलेले आहेत,” असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

“ही ऊर्जा नेहमी सकारात्मकच असते, फक्त आम्ही सैनिक म्हणून आमच्यासाठी सकारात्मक आणि दुसरा जर नकारात्मक असेल तर त्याला कसा सकारात्मक करायचं ती ऊर्जा घेऊन आम्ही जातो. जब तक चांद सूरज है तब तक बाळासाहेब है और तब तक शिवसैनिक है,” असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

शिवसेना मेळाव्याला प्रमुख उपस्थिती

शिवसेना सचिव – अनिल देसाई, विनायक राउत, आदेश बांधेकर, मिलिंद नार्वेकर, सुरज चव्हाण

युवासेना मुंबईचे पदाधिकारी – अमोल किर्तीकर आणि वरुण सरदेसाई

लोकसभा खासदार – अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे

राज्यसभा खासदार – प्रियंका चतुर्वेगी

विधानसभेचे आमदार – प्रकाश सुर्वे, सुनिल राऊत, रमेश कोरगांवकर, रविद्रं वायकर, सुनिल प्रभु, रमेश लटके, दिलीप लांडे, प्रकाश फातर्फेकर, मंगेश कुडाळकर, संजय पोतनीस, सदा सरवणकर, अजय चौधरी, यामिनी जाधव

विधानपरिषद आमदार – अनिल परब, विलास पोतनीस, मनिषा कायंदे, मंत्री नीलम गोर्हे

मुंबईच्या महापौर – किशोरी पेडणेकर

जनसंपर्कप्रमुख – हर्षल प्रधान

(Mayor Kishori Pednekar on Shivsena Dussehra Melava)

संबंधित बातम्या :
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.